शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास मोठे आंदोलन उभे करू – अब्दुलभैय्या शेख
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी नेवासा तहसील कार्यालयावर आवाज उठवला!
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास मोठे आंदोलन उभे करू – अब्दुलभैय्या शेख
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी नेवासा तहसील कार्यालयावर आवाज उठवला!
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तहसील कार्यालयावर तहसीलदाराला जबाब विचारण्याकरिता अब्दुल भैया शेख व असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

अतिवृष्टी झालेल्या पावसाच्या भागामध्ये काही ठिकाणी अजूनही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही तसेच माझ्या शेतकरी बांधवांना पीक अनुदान देखील मिळालेली नाही म्हणून या संदर्भात अधिकाऱ्यांना व तहसीलदारांना जवाब विचारला व शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत शेतकऱ्यांना पूर्ण माहिती मिळत नसल्याने नवीन तक्रार टेबल तुम्ही तिथे लावावा व येणाऱ्या आठ दिवसात शेतकऱ्यांचे पैसे त्यांना मिळावी ही मागणी केली / व या मागणीला तहसीलदार – संजय बिराजदार व सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन लगेच तीन तक्रार टेबल लावण्यात आले त्याचबरोबर येथे आठ दिवसात सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळूनजातील..
मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्याचे हाल मला माहित आहेत खऱ्या अर्थानं शेतीमालाला भाव नाही , अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकरी थक्क झालेला आहे , आणि अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्याला हे भोगाव लागते
अशा अनेक माझ्या माता भगिनी आहेत की जे येतात त्यांच्या अडीअडचणी सांगतात त्यामुळे त्याच्यावर पर्याय म्हणून आज तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन त्यांचा अधिकाऱ्यांचा निषेध केला
यापुढे काम न केल्यास तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा अब्दुलभैय्या शेख यांनी दिला आहे.
आंदोलनास शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.




