Breaking
ई-पेपर

देडगांव येथील महार वतन जमीनीची परस्पर विक्री करण्याचा घाट!

नेवासे तहसिलदारांना सदरील जमीन विक्री करण्यास परवानगी न देण्याची हिवाळे भाऊकीची मागणी!

0 6 0 5 0 3

देडगांव येथील महार वतन जमीनीची परस्पर विक्री करण्याचा घाट!

नेवासे तहसिलदारांना सदरील जमीन विक्री करण्यास परवानगी न देण्याची हिवाळे भाऊकीची मागणी!

नेवासा(प्रतिनिधी) -महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

देडगांव (ता.नेवासे) येथील महार वतन म्हणून मिळालेल्या जमीनीवर संबंधित वारसांचे कायदेशीर नांवे परस्पर वगळून ही जमीन विक्री करण्यासाठी चक्क बिन कब्जाचे साठे खरेदीखत करुन घेवून बेकायदेशीरपणे लिहून आणि नोंदवून घेतलेले असून ‘त्या’ आधारे या जमीनीची परस्पर विक्रीची नियमबाह्य परवानगी घेण्यासाठी देडगांव येथील कामगार तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर गट नंबर ६३६/२/अ या जमीनीच्या लावण्यात आलेल्या जाहीर प्रगटन नोटीसीवर हरकत असल्याचे लेखी निवेदन देडगांव येथील मनेष हिवाळे,नितीन हिवाळे,प्रशांत हिवाळे यांच्यासह हिवाळे परिवाराने नेवासे तहसिलदारांना देवून या जमीन विक्रीला परवानगी देवू नये मागणी केली आहे.
याबाबत नेवासे तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मौजे देडगांव येथील वरील गट नंबरची जमीन ही आमचे पुर्वज चिमन केरु हिवाळे यांच्या नांवे महार समाजासाठी शासनाकडून महार वतन म्हणून मिळालेली आहे तेंव्हापासून देडगांव येथील समस्त महार समाज या जमीनीची मेहनत मशागत करुन आपली उपजिविका चालवित आहे माञ ही जमीन महारवतन म्हणून देतांना चिमन केरु महार,ताराचंद जयवंता,किसन कोंडीबा,शामुवेल यशवंता अशी नांवे दिसून येत असतांना नंतर पुढे ही नांवे सातबारा सदरी घेतले गेले नसल्याचे दिसून येत असतांना माञ कब्जे वहिवाट ही अस्थित्वात आहे या जमीनीचे वारसदारांचे पुर्वज मयत झाल्यानंतर त्यांचे कायदेशीर वारस रेकॉर्ड ऑफ राईटला घेतले गेलेले नसून याचा गैरफायदा चिमन केरु हिवाळे याच्या काही वारसांनी घेवून ही जमीन विक्री करण्याची परवानगी घेवून खरेदीखत करण्याच्या तयारीत असून या प्रसिद्ध झालेल्या जाहिर प्रगटन नोटीसीप्रमाणे गावंच्या चावडीवर कोणतीही नोटीस प्रसिद्ध केलेली नसून दवंडीही दिलेली नाही त्यामुळे ही जमीन विक्री प्रक्रिया गोपनीय ठेवून जमीन विक्रीची माहीती कोणालाही होवू न देता लपवून ठेवण्याचा प्रकार देडगावात उघडकीस आल्यामुळे या जमीनीची विक्री करणाऱ्यांनी पहीली ही जमीन विकण्याचा रितसर पहीला अधिकार हिवाळे वारसदारांनाच असून ही जमीन सरकारी भावाप्रमाणे आम्ही खरेदी करण्यास तयार असल्यामुळे या जमीनीची विक्री करण्यासाठी परवानगी देवू नये आणि नजराना रक्कम भरुनही घेवू नये अशी मागणीचे निवेदन मनेष हिवाळे,नितीन हिवाळे,प्रशांत हिवाळे,अशिष हिवाळे,सुमित हिवाळे यांनी नेवासा तहसिलदारांना दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे