नजीक चिंचोली शाळेच्या दोन विद्यार्थिनींना राज्याबाहेर व राज्यांतर्गत सहलीची संधी…..

नजीक चिंचोली शाळेच्या दोन विद्यार्थिनींना राज्याबाहेर व राज्यांतर्गत सहलीची संधी…..
भेंडा – नेवासा (प्रतिनिधी ) :-
जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित
“राष्ट्रीय आविष्कार अभियान “अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना राज्याबाहेर व राज्यांतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नजीक चिंचोली,ता.नेवासा येथील विद्यार्थिनी कु. सानिध्या मुकुंद ठोंबरे हिला शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल राज्याबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी संधी मिळाली आहे; तर कु.साक्षी राहुल ठोंबरे इ. आठवी हिला राज्यांतर्गत सहलीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. दोन्ही विद्यार्थिनींचे गावच्या सरपंच सौ.वनमाला चावरे, उपसरपंच सौ. सोनाली जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्री.भागचंद पाटील चावरे ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, पालक यांनी अभिनंदन केले आहे.