Breaking
ई-पेपर

महाराष्ट्र राज्य प्राधिकरण नळ योजना सुरु करण्यासाठी थकित विजबिल भरण्यासंबधी शासनाने मदत करावी -आ.विठ्ठलराव लंघे यांची मागणी.

आमदार लंघे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व विधानसभा सभागृहाचे लक्ष वेधले.

0 4 0 5 3 5

महाराष्ट्र राज्य प्राधिकरण नळ योजना सुरु करण्यासाठी थकित विजबिल भरण्यासंबधी शासनाने मदत करावी – विठ्ठलराव लंघे यांची मागणी.

आमदार लंघे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व विधानसभा सभागृहाचे लक्ष वेधले.

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांनी तालुक्यातीलच नव्हे तर राज्यभरातील बंद पडलेल्या महाराष्ट्र राज्य प्राधिकरण नळ योजना सुरु करण्यासाठी थकित विजबिल भरण्यासंबधी शासनाने मदत करावी, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व विधानसभा सभागृहाचे लक्ष वेधले.

आ. विठ्ठलराव लंघे यांनी विधानसभेच्या सभागृहात काल तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा परिस्थिती गंभीर असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. गळनिंब व घोगरगांव प्राधिकरण नळ योजनेला शासनाकडून कोट्यवधी रुपये सध्या दुरुस्तीसाठी खर्च केला जात आहे. मात्र दुरुस्ती होऊनही हि योजना थकित विजबिला अभावी सुरु होणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.

या योजना सुरु करण्यासाठी मोठ्या प्रमाणात थकलेले विजबिल भरणे गरजेचे आहे आणि लाभार्थी गावांची ग्रामपंचायतीची अर्थव्यवस्था हि कमकुवत असल्याने त्यांना विजबिल

भरणे शक्य नसल्याने शासनाने थकीत विजबिल भरण्यासाठी मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे

तसेच तालुक्यातील शनैश्वर व ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचा विकासाचा मुद्दा उपस्थित केला. शनैश्वर देवस्थानम मुद्दा ध्ये चुकिच्या पध्दतीने कारभार सुरु असून निवडणुकीपूर्वी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अधिवेशात या विषयावर प्रश्न उपस्थित केल्याची आठवण करुन देत तेथे सुरु असलेल्या अनियमित कारभाराची चौकशी करुन समिती बरखास्त करण्याची मागणी करत सभागृहाचे लक्ष वेधले नेवासा ज्ञानेश्वर मंदिर हे धार्मिक तिर्थक्षेत्र जगभर प्रसिद्ध असूनही गेल्या कित्येक वर्षापासून विकासापासून वंचित असल्याचे सांगताना संपूर्ण तालुक्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या ज्ञानेश्वर मंदिराचा तत्कालीन ना. राधाकृष्ण विखे यांनी आठशे कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे