आपल्यातील माणसाला विधानसभेमध्ये पाठवणे आपल्या गरिबांसाठी अत्यंत महत्त्वाचे – हर्षदा काकडे

आपल्यातील माणसाला विधानसभेमध्ये पाठवणे आपल्या गरिबांसाठी अत्यंत महत्त्वाचे – हर्षदा काकडे
शेवगाव प्रतिनिधी :- (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
सर्वसामान्यांना पवार, मोदी, फडणवीस यांच्या दारात कामासाठी जायचं नसते, आपली कामे ही शेवगाव तालुक्यातच असते. आपले काम पंचायत समिती, तहसील, एम.एस.ई.बी., आणि एखाद्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये काम पडते. मग या कामासाठी सौ.हर्षदाताई आपल्याबरोबर समक्ष येऊ शकतात. कोणताही प्रस्थापित असे लहान कामे करीत नाही. म्हणून आपल्यातील माणसाला विधानसभेमध्ये पाठवणे आपल्या गरिबांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सामाजिक दलितांचे नेते प्रकाश तुजारे यांनी शेवगाव येथे केले.
आज दि.१६ रोजी जनशक्ती श्रमिक संघाच्यावतीने बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंच्या संचाचे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पृथ्वीसिंह काकडे, आबासाहेब काकडे, अशोक वाणी, भारत लांडे, जनाबाई उबाळे, वंदना उगले, सुमन काळे, मंदा सुरसे, अश्विनी मडके, सोनाबाई काकडे, नीलफोर शेख आदि प्रमुख महिला कामगार यावेळी उपस्थित होत्या.
पुढे बोलतांना तुजारे म्हणाले की, आज तालुक्यात गोरगरीब लोकांना कोणीच वाली राहिलेला नाही. एकट्या काकडे ताई या गोरगरिबांच्या हाकेला धावून येतात. बाकीचे प्रस्थापित फक्त मतलबी आहेत. आता मतासाठी हे तुम्हाला आमिष दाखवतील. पण आता गोरगरिबांनी त्यांच्या गुळचाट बोलण्याला बळी पडू नये. गोरगरिबांची माई म्हणूनच हर्षदाताईच योग्य ठरेल. कारण त्यांचं काम दीनदलित, गोरगरीब, शेतकरी यांचे कुटुंबासाठी चालू आहे. आज त्यांच्यामुळेच या दोनशे लोकांच्या कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. वर्षानुवर्षे सत्ता हे प्रस्थापित कारखानदार वाटून घेत आहेत व मातापुरतेच आपल्याला विचारतात. नंतर हे आपल्या कोणत्याही प्रश्नाला बांधील नसतात. त्यामुळे नवा चेहरा म्हणून हर्षदाताई काकडेंना येणाऱ्या विधानसभेत पाठवायचे आहे असेही प्रकाश तुजारे म्हणाले. यावेळी पृथ्वीसिह काकडे, देवराव दारकुंडे यांचेही भाषणे झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल बोडखे यांनी केले तर आभार ज्योती शिंदे यांनी मानले.