शेळ्या चारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडणाऱ्या चोरट्याना नेवासे पोलिसांनी केले २४तासात अटक!

शेळ्या चारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडणाऱ्या चोरट्याना नेवासे पोलिसांनी केले 24 तासात अटक!
नेवासे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
पाटाच्याकडेला एक महिला शेळ्या चारत असतांना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा जणांनी हा रस्ता कुठे जातो? असा विचारण्याचा बहाणा करून या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओरबडून घेऊन जाणाऱ्या दोन आरोपीना नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे,विकास पाटील,पोलीस कॉस्टेबल अतुल शेळके,पोलिस शिपाई गणेश जाधव, वाल्मीक वाघ, यांनी आरोपीनाअवघ्या 24 तासात अटक केली आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, या गुन्ह्यातील फिर्यादी बबनबाई बनकर या सुकळी (ता.नेवासे) या गावच्या शिवारात चारोटी पाटावर शेळ्या चारत असताना दोन अनोळखी इसम मोटार सायकलवरून आले व रस्ता कुठे जात आहे ? याबाबत या महिलेला विचारण्याचा बहाणा करून तीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने घेऊन गेले याबाबत या महिलेने नेवासे पोलीस ठाण्यात फिर्यात दाखल केलेली होती या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू,नेवासे पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे,विकास पाटील यांनी करून
सदर गुन्ह्यात तांत्रीक तपास तसेच सी.सी.टी.व्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढली असता सदरचा गुन्हा हा आरोपी सुदाम विक्रम जाधव याने त्याचे साथीदारासोबत केला आहे अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सदर आरोपीस 24 तासाच्या आत नेवासे पोलिसांनी चोरटे जेरबंद करण्यात यश मिळविल्यामुळे पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाणतेतून कौतुक केले जात आहे.
…………….//……….…//…………..//…………..//……..
शेळ्या चारणाऱ्या माहिलेला हा रस्ता कुठे जातो? असे विचारण्याचा बहाणा करून आरोपीने या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडण्याचा गुन्हा केल्याची कबुली आरोपीना पोलिसांनी खाक्या दाखवताच या गुन्ह्यांची कबुली दिली असून पुढील कायदेशीर तपास चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.




