Breaking
ई-पेपर

बदलत्या काळासोबत आपणही अद्ययावत व्हावे*

ज्येष्ठ पत्रकार अनिल पालीवाल यांचे आवाहन*

0 4 0 8 0 6

*बदलत्या काळासोबत आपणही अद्ययावत व्हावे*

*ज्येष्ठ पत्रकार अनिल पालीवाल यांचे आवाहन*

लोहारा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक पातळीवर प्रगतीसाठी प्रत्येक समाज घटकांनी बदलत्या काळासोबत परिवर्तन करून अद्ययावत व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र पालीवाल परिषदेचे महामंत्री व ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार द्वारकादास पालीवाल यांनी केले.

पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे सालाबादप्रमाणे चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित पालीपुत्रांची कुलस्वामिनी माँ आशापूर्णा शोभा यात्रा व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरणप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री दुर्गामातेचे मंदिरापासून मातेच्या श्री आरतीने शोभायात्रा सुरू करण्यात आली. लोहारानगरीच्या प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करीत शोभायात्रा बाजार चौकातील श्री महादेव मंदिरात आली. या शोभायात्रेत पालीवाल महिला व युवक तसेच युवतींनी ढोल ताशांच्या गजरात गरबा केला. तसेच मातेची धर्मध्वज पताका फडकावत नृत्य सादर केले. यावेळी मातेच्या जयजयकार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

*बारा वर्षांची परंपरा जोपासली*
गेल्या एक तपापासून सदर चैत्र नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. लोहारा, नेरी, नांद्रा, रोटवद, वरखेडी, पाचोरा, देव, जळगाव, भुसावळ, आदी गावांचे पालीपुत्र सहभागी होतात.

याप्रसंगी आठवी ते पीएचडीपर्यंतच्या शिक्षणात प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांची सूची पूढीलप्रमाणे,
1) पायल मुकेश पालीवाल
2) गौरी शाम पालीवाल
3) प्रांजल संजय पालीवाल
4) डॉ. रोशनी विकास पालीवाल
5) सिद्धी प्रवीण पालीवाल
6) दिव्या श्याम पालीवाल
7) अनिकेत पंकजकुमार पालीवाल
8) आयुष राजेंद्र पालीवाल
9) रिया मुकेश पालीवाल
10) पलक जितेंद्र पालीवाल
11) कनिष्का अकलेश पालीवाल
12) साक्षी नरेंद्र पालीवाल
13) स्वाती जितेंद्र पालीवाल

याप्रसंगी लोहारा आणि परिसरातील पालीवाल समाजासाठी भवन निर्माणसाठी ग्रामपंचायतीकडून भूखंड मागणीचा प्रस्ताव एकमुखाने मंजूर करण्यात आला.

यंदाच्या भोजनप्रसादिचे मानकरी सतीश माणकचंद पालीवाल, जळगाव यांच्या परिवारातर्फे मातेची आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महा. पालीवाल परिषदेचे संपर्क प्रमुख श्री पंकज राधेश्याम पालीवाल यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वितेसाठी युवा मंच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

याप्रसंगी प्रारंभी तीन वर्षीय बालिका कु. स्वरा विकास पालीवाल हिने सादर केलेल्या गणेश वंदना प्रार्थनेचे उपस्थितांनी कौतुक केले.

मिरवणुकीतील मार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येऊन माँ आशापूर्णाचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमास महाराष्ट्र पालीवाल परिषदेचे प्रमुख प्रतिनिधी, तसेच पंचक्रोशीतील पालिपुत्र बंधूभगिनी, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे