*कुकाणा महसूल मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
महसूली विविध योजनांचा लाभ वितरण..

*कुकाणा महसूल मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
महसूली विविध योजनांचा लाभ वितरण..
नेवासा /प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत कुकाणा महसूल मंडळ स्तरावरील पहिल्यां टप्प्यातील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कुकाणा येथील सिद्धिविनायक कार्यालयात आयोजित या शिबाराचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, तालुका भूमी अभिलेखचे श्री.गोसावी,भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे,भाजपा तालुका प्रमुख प्रताप चिंधे, डॉ.बाळासाहेब कोलते, भाऊसाहेब काळे, सरपंच लता अभंग, प्रमोद गजभार,विनोद ढोकणे महेश नवले, एकनाथराव कावरे, मछिंद्र कावरे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रास्तविक करतांना तहसीलदार संजय बिरादार यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट करत नागरिकांना महसूल विभागाच्या विविध योजना, प्रमाणपत्रे व सेवा याबाबत सविस्तर माहिती दिली. नागरिकांनी आपल्या विविध अडचणी व समस्या मांडाव्यात आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात केले.

या शिबिरामध्ये कुकाणा महसूल मंडळातील कुकाणा, तरवडी, भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, सुलतानपूर, गेवराई, वाकडी, पिंपरीशहाली, गोयगव्हाण, पाथरवाला, सुकळी बुद्रुक, सुकळी खुर्द, नांदूरशिकारी, अंतरवाली, चिलेखनवाडी या गावांतील नागरिकांना भोगवटादा वर्ग-२ चे वर्ग-१ आदेश वाटप (पुनर्वसन),कृषी अवजारे व ट्रॅक्टर वाटप,उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र वाटप,जिवंत ७/१२ टप्पा १ व २ मधिल कामकाज
डिजीटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८अ उताऱ्यांचे वाटप,सामाजिक अर्थसहाय्यि योजना लाभार्थ्यांना लाभ देणे, रेशनकार्ड मध्ये नाव कमी व किंवा समाविष्ट करणे,अॅग्रीस्टॅग, पी.एम. किसान नोंदणी व के.वाय.सी, पोटखराबा वहितीखाली आणणे
प्रलंबित फेरफार,अकृषिक नविन तरतुदींबाबत मार्गदर्शन,अभियान अंतर्गत ७/१२ मधील दुरुस्त्या
भुसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणे कमी जास्त पत्रक तयार करून गाव दप्तरी अद्यावत करणे,या विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.आरोग्य शिबीर तसेच मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्रक्रिया शिबिराचा लाभ तसेच कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना शेती औजारे तसेच ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी दौलतराव देशमुख, भाऊसाहेब फोलाने, अमोल अभंग, बाळासाहेब कचरे, संदीप देशमुख, किशोर मिसाळ,आकाश चेडे,भाऊसाहेब सावंत ,मछिंद्र आर्ले, बबनराव पिसोटे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळअधिकारी तृप्ती साळवे, ग्राममहसूल अधिकारी अभिजित क्षीरसागर,विजय काळे, प्रियंका चव्हाण,राहुल राऊत,प्रवीण श्रीखंडे, महसूल सहाय्यक संजय भालेकर, सुभाष महाशिकारे, राजेंद्र काळे, जॉय ओहळ, बाळासाहेब शिंदे,किरण शिंदे, बाळासाहेब शिरसागर, मच्छिंद्र मुंगसे,आदिनाथ थोरे,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आगळे,आदिनी परिश्रम घेतले. या शिबिरामुळे नागरिकांच्या विविध महसुली व प्रशासकीय अडचणींचे निराकरण होऊन शासनाच्या योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सोमनाथ कचरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ग्राममहसूल अधीकारी अभिजित क्षीरसागर यांनी
आभार मानले.




