*नेवासा तालुक्यातील भेंडा बु. येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी नियमित पदांना शासनाची मंजुरी*
*आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पाठपुराव्याला यश; आरोग्य सुविधा अधिक सक्षम होणार*
*नेवासा तालुक्यातील भेंडा बु. येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी नियमित पदांना शासनाची मंजुरी*
*आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पाठपुराव्याला यश; आरोग्य सुविधा अधिक सक्षम होणार*
नेवासा | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील भेंडा बु. येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेवांना मोठा दिलासा मिळाला असून विविध नियमित पदांच्या निर्मितीस शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या पदनिर्मितीस मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, वाहनचालक तसेच इतर आवश्यक कर्मचाऱ्यांच्या पदांचा समावेश आहे.
मंजूर झालेल्या पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी (गट-अ) – २, आरोग्य सहाय्यक – ३, सहाय्यक परिचारिका प्रसविका – १, औषधनिर्माता – १, कनिष्ठ लिपिक – १, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १, स्टाफ नर्स – १, पुरुष परिचर – ३, वाहनचालक – १ आणि सफाईगार – १ अशा विविध पदांचा समावेश असल्याची माहिती आमदार लंघे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे.
या पदभरतीनंतर उपकेंद्रातील मनुष्यबळाची कमतरता दूर होऊन रुग्णांना अधिक प्रभावी उपचार, तपासण्या आणि आरोग्य सुविधा मिळतील. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निर्णयाचे भेंडा परिसरासह संपूर्ण नेवासा तालुक्यात स्वागत होत असून, ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे




