मध्यप्रदेश येथील महंत योगी त्यागीनाथ जी महाराज (कुंडल वाले)बाबांची देवगडला भेट.

मध्यप्रदेश येथील महंत योगी त्यागीनाथ जी महाराज (कुंडल वाले)बाबांची देवगडला भेट.
नेवासा(प्रतिनिधी)-सुधीर चव्हाण
मध्यप्रदेश राज्यातील नरसिंगपूर येथील श्री श्री १००८ श्री सिद्ध भोई बाबा आनंद आश्रम चिंकी घाट नर्मदा विभागाचे महंत योगी त्यागीनाथजी महाराज (कुंडल वाले)व श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराजांनी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या सुरू असलेल्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने भेट दिली.
देवगड गुरूदेव दत्त पिठाच्या भेटी प्रसंगी
मध्यप्रदेश येथील महंत योगी त्यागीनाथ जी महाराज (कुंडल वाले)बाबा यांनी भगवान श्री दत्तात्रय,श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर,पंचमुखी सिद्धेश्वर, कार्तिक स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. देवगडचा निसर्गरम्य परिसर,प्रवरा माईचा घाट परिसरातील स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी गुरूदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत राष्ट्र संत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी या संत मंडळींचे संतपूजनाद्वारे स्वागत केले.यावेळी संतसेवक बाळू महाराज कानडे,तात्या महाराज शिंदे,संतसेवक शुभम महाराज बनकर, वेदशास्त्र संपन्न आचार्य गणेशदेवा कुलकर्णी,हेमंतदेवा कुलकर्णी,पत्रकार सुधीर चव्हाण,पत्रकार नामदेव शिंदे,पत्रकार सोमनाथ कचरे, पत्रकार बाळासाहेब पिसाळ,सेवेकरी सुरक्षा रक्षक संदीप पांढरे उपस्थित होते




