स्वामी आई महिला ग्राम संघाचे उद्घाटन..

स्वामी आई महिला ग्राम संघाचे उद्घाटन..
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, नेवासा अंतर्गत भेंडे प्रभागातील रांजणगावदेवी येथील स्वामी आई महिला ग्राम संघाचे उद्घाटन माननीय गट विकास अधिकारी श्री. संजय लखवाल साहेब आणि पोलीस उपनिरीक्षक अहिरे साहेब व बँक ऑफ बडोदा भेंडा शाखा व्यवस्थापक दीपक कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी 21 लाख 60 हजार CIF निधीचे वितरण करण्यात आले,त्याचबरोबर बँक ऑफ बडोदा कडून 6 गटांना 25 लाख रुपये कर्ज वितरण करण्यात आले.
या ग्रामसंघाच्या कार्यालयातून भविष्यात ग्रामविकासाचे विविध उपक्रम राबविण्यात येतील.या प्रसंगी सीआरपी संगीता वाळुंजकर यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक अर्जुन सोनवणे ,प्रभाग समन्वयक मीनाताई कदम, श्रीमती ऐश्वर्या देशमुख, श्रीमती सुजाता कीर्तीशाही श्री नितीन पंडित, ज्ञानेश्वर कांबळे, ग्रामविकास अधिकारी रमेश गायके, सरपंच कल्पना लोखंडे, मंडल अधिकारी सरिता मुंडे, तलाठी श्वेता काळे, भेंडा गावचे सरपंच नामदेव निकम, कारेगावचे सरपंच गोरखराव सातदिवे. रांजणगाव मधील समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..




