Breaking
ई-पेपर

सरकार हे नेहमी धार्मिक कार्यासाठी अग्रेसर..-आ. विठ्ठलराव लंघे.

0 4 6 2 6 5

सरकार हे नेहमी धार्मिक कार्यासाठी अग्रेसर…..आ. विठ्ठलराव लंघे.

नेवासा प्रतिनिधी –

तालुक्यातील विकास कामे करणे व तालुक्यातील धार्मिक कार्याला हातभार लावण्यासाठी हे सरकार नेहमी अग्रेसर असल्याचे पहावयास मिळते असे देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज हे आपल्या काल्याच्या कीर्तन सेवेतून बोलताना म्हणाले.

देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज खेडले काजळी येथील काल्याचे किर्तन वेळी बोलत होते बाबाजी पुढे बोलताना म्हणाले की लोकप्रतिनिधींनी येत्या काळामध्ये गोमातेसाठी मोठा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करावेत व गोमातेला राष्ट्रमाता म्हणून दर्जा दिलाच त्याबद्दल त्यांनी सरकारच्या अभिनंदन ही केले.
देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज खेडले काजळी येथे काल्याचे किर्तन प्रसंगी बोलत होते.

आमदार लंघे याप्रसंगी बोलताना म्हणाले की सरकारी नेहमी धार्मिक कार्यासाठी अग्रेसर आहे भविष्यकाळामध्ये नेवासा तालुक्यातील तमाम जनतेची जेवढी सेवा करता येईल जेवढी शक्य होईल तेवढी मी करणार आहे.

शासनाने गोशाळेसाठी प्रत्येक गाई प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे.

थोर संत महंतांचे तसेच आपल्या देवगड देवस्थानचे गुरुवर्य बाबांची ही नेहमी मागणी राहिलेली आहे की कायदे हे कठोर झाले पाहिजेत त्याच पद्धतीने सरकार पावले उचलत असल्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी बोलताना सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की प्रत्येक गावामध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मला लाडक्या बहिणीची तसेच सर्व जनतेचे आभार मानण्याची संधी मला मिळत आहे हे माझे परमभाग्य तसेच तालुक्याभरातील अनेक गावांचे प्रश्न अनुत्तरीत आहेत आहेत रस्ते, पाणी ,वीज या मूलभूत प्रश्नावरती मी भविष्य काळामध्ये काम करणार आहे आणि ते काम करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की गुरुवर्य बाबाजीं सारखे संत आपल्याला तालुक्यात आशीर्वाद देण्यासाठी नेहमी आपल्या पाठीशी आहेत तसेच संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान सारखे देवस्थान आपल्या तालुक्यात आहे हे आपल्या तालुक्याचे भाग्य आहे तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस खांबाच्या विकास कामासाठी मोठा आराखडा तयार असून भविष्यकाळामध्ये तेही काम पूर्ण होणार असल्याचे आमदार लंघे यांनी बोलताना सांगितले आमदार लंघे हे देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या काल्याचे कीर्तनाच्या प्रसंगी खेडले काजळी येथे बोलत होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 2 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे