*पाथरवाला विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
*सभेच्या अध्यक्षपदी पंढरीनाथ खाटीक; सभासदांच्या विविध प्रश्नांवर चर्चा*

*पाथरवाला विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
*सभेच्या अध्यक्षपदी पंढरीनाथ खाटीक; सभासदांच्या विविध प्रश्नांवर चर्चा*
नेवासा तालुका | प्रतिनिधी :
पाथरवाला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी पंढरीनाथ खाटीक (सर) होते.
सभेच्या प्रारंभी उपस्थित सभासदांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचा आढावा, आर्थिक व्यवहार, लेखापरीक्षण अहवाल तसेच आगामी वर्षातील नियोजनाबाबत सभासदांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेत संस्थेच्या सन २०२४-२५ च्या आर्थिक व्यवहार व लेखापरीक्षण अहवालास मंजुरी देण्यासह आगामी आर्थिक वर्षासाठी आवश्यक आर्थिक नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. संस्थेच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणणे, सभासदांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे, थकबाकी वसुलीला गती देणे आणि सभासदांच्या हिताच्या योजना प्रभावीपणे राबविण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी संस्थेचे चेअरमन प्रमोद रामनाथ खाटीक, व्हा. चेअरमन नागासाहेब गंगाधर खाटीक व सचिव पी. बी. खाटीक यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
सभेतील विविध विषयांवर सभासदांनी मते मांडली. अध्यक्ष पंढरीनाथ खाटीक यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व सभासदांनी संचालक मंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सभेची सांगता आभार प्रदर्शनाने झाली



