*NEET-UG मध्ये पियुष अंबाडेची झेप; रस्तापूरमध्ये आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार*

*NEET-UG मध्ये पियुष अंबाडेची झेप; रस्तापूरमध्ये आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार*
नेवासा प्रतिनिधी -महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क
रस्तापूर, ता. नेवासा : जिद्द, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर NEET-UG या राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या रस्तापूर येथील चि. पियुष शहाराम (पा.) अंबाडे यांचा गावात आयोजित भव्य जाहीर सत्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पियुषचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आमदार लंघे पाटील म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवणे ही संपूर्ण नेवासा तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. पियुष अंबाडे याने मिळवलेले यश हे केवळ त्याच्या कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण परिसराचे यश असून, त्याच्याकडून भविष्यात उत्कृष्ट डॉक्टर म्हणून समाजसेवेची अपेक्षा आहे.” त्यांनी पियुषला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी पियुषचे अभिनंदन करत त्याचा आदर्श घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. विजयाताई अंबाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब अंबाडे, माजी सोसायटी चेअरमन भाऊसाहेब सावंत, नितीनजी महाराज हारकळ, आसाराम पा. मधे, कौठाचे सरपंच प्रमोदजी गजभार, नवनाथ साळुंके, रस्तापूरचे उपसरपंच अण्णासाहेब अंबाडे, सोसायटी चेअरमन महेबुब शेख, मछिंद्र कावरे, नाना अजोरा, आत्माराम महाराज कोकाटे, अर्जुन महाराज पवार, विवेक अंबाडे, भारतराव गरड, सुरेशराव अंबाडे, दौलतराव देशमुख, भाऊसाहेब फोलाणे, बाळासाहेब कचरे, भास्करराव भाकुड सर, अंबाडे पाटील परिवार तसेच रस्तापूर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या पियुष अंबाडेच्या या यशामुळे रस्तापूर गावाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, या यशाने अनेक विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली



