पंढरपूरच्या वाटेवर भक्तांसाठी मायेची सावली..
स्मार्ट किड्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी वारीत केल पाणी व अल्पोपहाराचे वाटप!

पंढरपूरच्या वाटेवर भक्तांसाठी मायेची सावली..
स्मार्ट किड्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी वारीत केल पाणी व अल्पोपहाराचे वाटप!
नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
पावसाच्या आशेने आणि भक्तीच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या पायवाटेला एका गोड आठवणीचा स्पर्श झाला. स्मार्ट किड्स अकॅडमी, सोनई येथील लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्या हातांनी वारकऱ्यांना पाणी आणि अल्पोपहार वाटून एक अनोखी सेवा साकारली.
ही केवळ सेवा नव्हती, तर विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सेवा, आणि आध्यात्मिकतेचा बीजारोपण करणारा प्रेरणादायी उपक्रम होता. “जल ही जीवन आहे” या संदेशासोबत त्यांनी पाण्याच्या बचतीचा संदेशही देत वारकऱ्यांमध्ये जनजागृती केली.पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी पायी वारी करणाऱ्या दिंडीतील भाविकांना हातात पाण्याचे पाऊच, फराळ दिले आणि सुंदर संदेश फलक दर्शविले. अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यांत या बालसेवेने पाणी आलं.
या वेळी शिक्षक वर्ग, विद्यार्थी, असंख्य वारकरी, पोलिस प्रशासन तसेच स्मार्ट किड्स अकॅडमीच्या मुख्याध्यापिका सौ. सोनल परेश लोढा मॅडम, संस्थापक श्री. परेश लोढा सर,शिक्षक वैभव बऱ्हाटे सर,फ्युजन आर्ट्सचे डॉ. उपदेश मोटे पा., यादव सर आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…..,…………………..,……..,……………………………….
-स्मार्ट किड्स अकॅडमीचे संस्थापक सोनल लोढा मॅडम यांनी सांगितले की, “शालेय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी समाजसेवा, श्रद्धा आणि आध्यात्मिक मूल्यं यांचंही भान ठेवावं, यासाठीच हा उपक्रम आयोजित केला होता.”




