भेंड्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा घेतला १५ लाखाचा वैयक्तिक अपघात विमा
पत्रकार सुखदेव फुलारी यांचा पुढाकार...

पत्रकार सुखदेव फुलारी यांचा पुढाकार…
*भेंड्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा घेतला १५ लाखाचा वैयक्तिक अपघात विमा*
नेवासा प्रतिनिधी — महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील पत्रकार सुखदेव फुलारी यांनी पुढाकार घेवून स्वत:च्या खर्चाने भेंडा येथील वृत्तपत्र विक्रेत्यांचा प्रत्येकी १५ लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा घेण्यात आला आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील भगवान आसाराम धाडगे,अशोक दगडू जामदार या दोन वृत्तपत्र विक्रेत्यांचा श्री.सुखदेव फुलारी यांनी भारतीय पोस्ट विभागाकडून प्रत्येकी १५ लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा उतरविला आला आहे. या विमा पॉलिसी अंतर्गत तसेच सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फरशीवरून घसरून पडणे, गाडीवरील अपघात असे सर्व अपघात यात कव्हर होतात.अपघाती मृत्यु १५ लाख रूपये,
कायमचे अपंगत्व १५ लाख रूपये,
दवाखाना खर्च (आयपीडी)६० हजार रूपये,बाह्यरुग्ण खर्च(ओपी.डी) ३० हजार रूपये,मुलांचा शिक्षण खर्च १
लाख रूपये,एडमिट असे पर्यंत १० दिवसांसाठी दररोज १ हजार रूपये,
अपघाताने मोडलेले हाड १ लाख रूपये,अपघाताने कोमा मध्ये गेल्यास
१ लाख रूपये,कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च २५ हजार रूपये भरपाई
मिळण्याची तरतूद आहे.
भेंडा पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर
अर्जुन उगले यांचे हस्ते या विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले. यावेळी पत्रकार सुखदेव फुलारी, नामदेव शिंदे,पोस्टमन बिरदेव काळे
आदी उपस्थीत होते.
—————————–

भेंडा येथील वृत्तपत्र विक्रेत्यांना रस्ता अपघात विमा पॉलिसीचे वितरण करतांना पोस्टमास्तर अर्जुन उगले, पत्रकार सुखदेव फुलारी,नामदेव शिंदे आदी.




