Breaking
ई-पेपर

श्री क्षेत्र देवगड येथील प्रवरा नदीवरील अपूर्ण पूलासाठी आमदार लंघे यांची पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निधीची मागणी..

0 4 4 9 7 3

श्री क्षेत्र देवगड येथील प्रवरा नदीवरील अपूर्ण पूलासाठी आमदार लंघे यांची पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निधीची मागणी..

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

 

आज अहिल्यानगर येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भव्य कार्यकर्ता मेळावा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्याप्रसंगी नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांनी तालुक्याच्या प्रलंबित विविध विकास कामाबद्दल त्यांना माहिती दिली. त्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून अपूर्ण असलेला श्री दत्त मंदिर संस्थान देवगड येथील प्रवरा नदीवरील पादचारी पूलाच्या अपूर्ण कामासंदर्भात पर्यटनमंत्र्यांचे लक्ष वेधले. परिसरातील दहा ते बारा गावांचा संपर्क व दळणवळणासाठी मोठा गंभीर प्रश्न व या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी कमतरते चा लेखी अहवाल प्रस्ताव सादर करून गेल्या दहा वर्षापासून काम निधी कमतरते मुळे अपूर्णअवस्थेत असून परिसरातील 13 गावांच्या येण्या जाण्याच्या नागरिकांना विद्यार्थ्यांना व देवगड भक्त परिवार यांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे यासाठी या पूलाचे काम किती महत्त्वाचे आहे हे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांना निदर्शनास आणून दिले. दत्त मंदिर देवस्थान दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे तसेच परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थी व असंख्य पायी येणाऱ्या दिंड्या या प्रवरा नदीतून होडी द्वारे धोकादायक प्रवास करत असतात. यांचे गैरसोय रोखण्यासाठी आपण या पूलासाठी ताबडतोब निधी उपलब्ध करून द्यावा व काम तात्काळ चालू करून भाविकांची गैरसोय टाळावी अशा निवेदनाचा प्रस्ताव आज नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपूर्त केला.या प्रवरा नदीवरील पुलाला नेवासा बुद्रुक सब स्टेशन जवळील जुना गोधेगाव रस्ता धामोरी मार्गे जोडला तर परिसरातील कालभैरवनाथ देवस्थान, नाथबाबा मंदिर देवस्थान ही देवस्थाने जोडली जाणार असून त्याचा फायदा बहिरवाडी धामोरी उस्थळ खालसा,सुरेगाव ,भालगाव, बेलपिंपळगाव जैनपूर बेल पांढरी, साईनाथ नगर टाकळीभान व श्रीरामपूर रोड मार्गे येणारा देवगड परिवार व या परिसरातून येणाऱ्या भाविकांसाठी व दिंड्यांसाठी पाच किलोमीटर अंतर कमी होऊन सोयीस्कर होणार आहे या नवीन मार्गामुळे परिसराचा अधिकाधिक विकास होऊन दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे . यासंदर्भात पर्यटन मंत्री सकारात्मक असून लवकरच या पूलाचे व प्रलंबित रस्त्याचे कामासाठी भरगच्च निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांनी दिलीअशी माहिती नेवासा चे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे