नितीन दहे यांची पाचेगाव गणातून उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांच्या यादीत आघाडीवर….
नितीन दहे यांची पाचेगाव गणातून उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांच्या यादीत सगळ्यात आघाडीवर..
नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नितीन दहे हे पाचेगाव गाणा मधून पंचायत समिती साठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांची चर्चेला पाचेगाव गणामध्ये उधाण आले आहे.
सध्याला त्यांनी पाचेगाव गणामध्ये चांगलीच पायाला भिंगरी लावून जनसामान्याच्या नागरिकांपर्यंत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्याचे तसेच सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पहावास मिळत आहे . नितीन दहे हे कांदा व्यापारी असून त्यांचा शेतकऱ्यांच्या तसेच गोरगरीब जनतेचे प्रश्नांची जाण असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची पाचेगाव गणामध्ये ओळख आहे.
त्याच कार्याचा फायदा त्यांना येत्या निवडणुकीमध्ये होणार असल्याची चर्चा पाचेगाव गणामध्ये होताना पाहावयास मिळत आहे.
तसेच आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सोबत विधानसभेच्या काळामध्ये जीवाचे रान करून त्यांनी आमदार पदावर विराजमान होण्यासाठी आमदार लंघे यांना पाचेगाव गणा मधून त्यांनी मताधिक्य लीड दिले होते.
दादाराम आघंम,(कांदा व्यापारी) हरिभाऊ जगताप, शांताराम तुवर, यांनी नितीन दहे यांना उमेदवारी पाचेगाव गणातून मिळावी या साठी आमदार लंघे यांच्याकडे मागणीचा पाठपुरावा करून उमेदवारी द्यावी अशी मागणी करताना पाहावयास मिळत आहे.
तरी पाचेगाव गणा मधून होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणा मधून त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार मागणी होताना जनतेमधून दिसत आहे तरी आमदार लंघे यांचे कट्टर समर्थक नितीन दहे यांना योग्य न्याय आमदार लंघे यांच्याकडून दिला जाईल का? हे पाहणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे.




