शिरसगाव येथील युवा उद्योजकाने अनाथालयात मिष्टान्न भोजन देत केला आपला चौतीसावा वाढदिवस साजरा.

शिरसगाव येथील युवा उद्योजकाने अनाथालयात मिष्टान्न भोजन देत केला आपला चौतीसावा वाढदिवस साजरा….
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी असलेले युवा उद्योजक लखन देशमुख यांच्या चौतिविसाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने संत गाडगेबाबा अनाथ आश्रमामधील निराधार मुलांच्या समवेत केला वाढदिवस साजरा व मिष्टअन्न भोजन देऊन जोपास अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी चौतीसाव्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून हा उपक्रम ज्यांनी राबवला ते लखन देशमुख बोलताना म्हणाले की आजकालच्या युवा पिढीमध्ये वाढदिवस हे वेगवेगळ्या पद्धतीने थाटामाटा साजरे केली जातात परंतु या सर्व प्रथांना फाटा देत मी आज आगळ्या वेगळ्या संकल्पना जोपासत अशी ठरवले होते त्याच वेगवेगळ्या संकल्पनेतून आज संत गाडगेबाबा अनाथ आश्रम भानासहीवरा या ठिकाणी बाल गोपाळांच्या समवेत अन्नदान करून त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते आणि तो आज वाढदिवस मी साजरा करत आहे त्याचा मला आनंद होत असल्याचे त्यांनी मीडियाशी बोलतांना सांगितले.
या वाढदिवस कार्यक्रम प्रसंग गणेश गोरे, संदीप आहेर, अभिषेक देशमुख, वैभव देशमुख, प्रशांत गोरे नरेंद्र मिसाळ, आदिनाथ पोटे, गणेश पाराजी गोरे, दीपक पोटे, ऋषिकेश गाडेकर, कृष्ण खजिनकर, रोहिदास देशमुख, लखन देशमुख, सचिन गवांदे, सचिन हाडूळे, शिवाजी गरड ,शिवाजी पोटे, महेश समोसे, पांडुरंग खजिनकर, आदिनाथ पोटे, शुभम देशमुख, लखन चामुटे, ओम शिंदे, अमित शिंदे, प्रदीप देशमुख.




