किड्स किंगडम विद्यालयात बालगोपाला नी घेतला दहीहंडी चा आनंद..
किड्स किंगडम विद्यालयात बालगोपाला नी घेतला दहीहंडी चा आनंद..
कुकाणा प्रतिनिधी –
एकीकडे गोविंदा पथकांमध्ये शहरातील लाखमोलाच्या दहीहंडी फोडण्याची शर्यत सुरू असतानाच कुकाणा येथे किड्स किंगडम विद्यालयात शाळांमध्येही बालगोपालांनी दहीहंडीचा चांगलाच आनंद घेतला. विद्यालयात श्रीकृष्णाच्या वेशभूषेत अवतरलेल्या बालगोपालांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडल्या. यानिमित्ताने शाळांमध्ये वेशभूषा तसेच इतर विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते.शाळेतील विद्यार्थी राधा-कृष्ण च्या वेशभूषेत आले होते. विद्यार्थांनी श्रीकृष्ण च्या गाण्यावर नृत्य करून व तयार होऊन आलेल्या चिमुकल्या राधा-कृष्ण यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच गोपाळकाला निमित्ताने शाळेत दहीहंडी फोडण्यात आली.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने गोपालकाला व दहीहंडीचा कार्यक्रम झाला. शिक्षिका अनिता बडे यांनी विद्यार्थ्यांना दहीहंडीबद्दल माहिती दिली. कार्यक्रमात अनिता बडे प्रतिभा कदम,सोनाली जामदार,कोमल म्हस्के, पूजा पवार आदी शिक्षिका कर्मचारी यांनी सहभाग घेत परिश्रम घेतले या प्रसंगी महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.