Breaking
ई-पेपरराजकिय

विधानसभेला महायुतीत अजितदादा पवार गटाकडून उमेदवार म्हणून अब्दुल शेख नावाच्या नवीन चेहऱ्याला संधी मिळणार का ?

0 4 0 5 3 5

विधानसभेला महायुतीत अजितदादा पवार गटाकडून उमेदवार म्हणून अब्दुल शेख नावाच्या नवीन चेहऱ्याला संधी मिळणार का?

घेऊन आलोय भावांची वारी,शासन आता बहीनींच्या दारी अब्दुल शेख यांचा उपक्रम…

नेवासा प्रतिनिधी – (महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )

सध्या दोन महिन्यातच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे वारे नेवासा तालुक्यामध्ये वहायला सुरुवात झाली आहे त्याच अनुषंगाने कुकाणा येथील रहिवासी असलेले सुपुत्र अब्दुल शेख हे सध्याला तालुक्यामध्ये अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून तालुका पिंजून करताना पाहावयास मिळत आहे.

त्यांच्याशी पत्रकारांनी चर्चा केली असता ते येत्या विधानसभेला नेवासा तालुक्यामधून अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. तसेच ते बोलताना खाजगी मध्ये पत्रकारांशी म्हणाले की अजित दादा पवार गटाकडून नेवासा तालुक्यातील उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे बोलताना म्हणाले की माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच महायुतीच्या ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम तसेच महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना असेल तसेच युवकांसाठी रोजगार योजना असेल, तसेच महिलांसाठी विविध योजना असेल ते मी तालुक्यामध्ये राबवणार असल्याचे अब्दुल शेख यांनी बोलताना सांगितले.

ते सध्याला नेवासा तालुक्यातील कुकाना व कुकाना परिसरातील तसेच रांजणगाव आदी गावातील परिसरामध्ये गावोगावी महिला वर्गांच्या बैठका घेत आहेत व त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुतीचे योजना घरोघरी पोहोचवण्याचे काम ती सध्याला करत असल्याचे पहावयास मिळत आहे तसेच त्यांच्या रूपाने महायुतीला नवा युवा चेहरा नेवासा तालुक्याला अब्दुल शेख यांच्या रूपाने नेवासा तालुक्यात एक नवीन चेहरा उमेदवार म्हणून मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष.

त्यांनी आज रोजी भेंडा व रांजनगाव देवी येथुन सुरवात करत महीलांशी संवाद साधुन शासन आपल्या दारी कार्यक्रमाची सुरवात केली.या यात्रेच्या माध्यमातुन अब्दुल शेख बोलताना म्हणाले की जनतेची सेवा करने हाच माझा मुख्य उद्देश असुन सर्वसामान्य लोकांना न्याय मीळवुन देन्यासाठी मी एक भाऊ म्हनुन एक मुलगा म्हनुन तुमच्या समस्या जानुन घेन्यासाठी आपल्या दारी आलो आहे.

त्यांना आज रांजणगाव येथे आजच्या पहिल्या दिवशीच महिलांचा अतिशय चांगला प्रतिसाद मीळाला या प्रसंगी उपस्थित असलेल्या महिलांना अजीत दादा पवार मोफ़त आरोग्य सेवा कार्ड ची माहीती दिली व सर्व शासकीय योजनेची माहीती देत मोफ़त लाभ घेन्या करीता उपस्थित महिला माता-भगिनींना अब्दुल शेख त्यांनी अवाहन केले.

अब्दुल शेख च्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाच्या माध्यमातून ते सध्याला नेवासा तालुक्यामध्ये सक्रिय झालेले आहेत पुढील काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित दादा पवार गटाकडून अब्दुल शेख यांचा नेवासा तालुक्यामध्ये उमेदवारीच्या नावाची चर्चा होताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे.

अब्दुल शेख हे राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात त्यांनी पुण्यामध्ये यामागे अनेक गोरगरीब जनतेचे रुग्णालयाची कामे असतील शासकीय कामे असतील हे ते नेहमी समाजसेवा करत असतात त्याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ते सध्या नेवासा तालुका भर फिरत आहे पूर्ण नेवासा तालुका पिंजून काढण्याचे काम करत आहे व त्यामध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार तसेच महायुतीच्या सरकारच्या विविध योजना असतील तळघळातील युवक असतील तसेच तळागाळातील महिला असतील यांच्या पर्यंत पोहोचण्याचे काम सध्याला अब्दुल शेख हे नेवासा तालुकाभर करत असल्याचे पहावयास मिळत आहे.

तसेच नेवासा तालुक्यामध्ये सर्वच पक्षाच्यावतीने मोर्चे बांधणी चे कामे जोरदार सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे परंतु पुढील काळातच सर्वच पक्षाच्या नेत्यांना चिंता पडली आहे की उमेदवारी भाजपला की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सर्वच भाजप अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यांनी मोर्चे बांधणी जोरदार तालुक्यामध्ये सुरू केली आहे तरी ही येता काळच ठरवेल की कोणाला व कोणत्या पक्षाला उमेदवारी व कुणाचे पारडे जड याचीच चाचणी सध्याला सर्व नेत्यांकडून केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे