किड्स किंगडम विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन संपन्न….

किड्स किंगडम विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन संपन्न….
कुकाणा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
कुकाणा येथील किड्स किंगडम विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
फॅन्सी ड्रेस स्पर्धा त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्कृष्ट सादरीकरण केले, विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत आले,वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती, सामाजिक घटक, आदी ड्रेस परिधान केले होते ते लक्षवेधि ठरले कार्यक्रमासाठी
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या प्रमुख प्राचार्या कीर्ती बंग उपस्थित होत्या, या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले, वेशभूषा स्पर्धेत
राजवीर राठोड, मानस चोपडे,आयुष्य भंडारी, शिवतेज कचरे,श्रीतेज कचरे,आयुष्य नवले, कृष्णा शिंनगारे, इंद्र निल देशमुख , अभिज्ञा वेताळ,ओवी कावरे,अरना गर्जे, अधिरा देशमुख ,पिटेकर आयुष ,अभिमन्यू आरगडे ,राजवी बांदल ,शिवाश शिंदे ,स्वरांश शिंदे या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये वीर प्रताप सिंह देशमुख हा चंद्रयान तीन बनून आला व त्यांने प्रथम क्रमांक मिळवला.स्पर्धेसाठी प्रसंगी शिक्षिका अनिता बडे प्रतिभा कदम,सोनाली जामदार, पूजा पवार रोहिणी सरोदे आदी शिक्षिका कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.