राजकारणापलीकडे जाऊन विकास कामांना प्राधान्य – ना. विठ्ठलराव लंघे
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेतृत्व करत असताना कायम राजकारण न करता सामाजिक बांधिलकी ठेऊन काम करत आलो राजकारणापलीकडे जाऊन विकास कामांना प्रधान्य देत जनतेची सेवा करत राहू, असे प्रतिपादन कुकाणा येथे टकारी वस्ति ते कावरे वस्ती या
रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी नामदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केले. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष मा.ना. श्री.विठ्ठलरावजी लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कुकाना (रामा ५०) ते कावरे वस्ती रस्ता (ग्रामा १९३) कि.मी ०/०० ते १/०० मध्ये डांबरीकरण कामाचे भूमिपूजन उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय श्री.विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते व मा.आ. श्री.बाळासाहेब मुरकुटे. यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या वेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,हे व्यासपीठवर बोलत होते. प्रसंगी किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अंकुशराव काळे,राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते अब्दुल शेख,जेष्ठ नेते डॉ. बाळासाहेब कोलते,भाजपा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब गव्हाणे, ओबीसी सेल चे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, सरपंच लताताई अभंग, माजी सरपंच एकनाथराव कावरे, अमोल अभंग,भाजपा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ कचरे,चंपूशेठ बोरा,ग्रामपंचायत सदस्य इकबाल इनामदार,हकीमाबी शेख, मछिंद्र जाधव, सुनील गोर्डे, शरद शिंदे, शरद जाधव, शरद गरड,अप्पासाहेब कावरे,तुकाराम कण्हेरकर,पांडुरंग कावरे, सतीश कावरे, मछिंद्र कावरे,कारभारी गोर्डे, किरण शिंदे, असिफ सय्यद,अरुण गरड,विठ्ठल कावरे, राजेंद्र खराडे,सिद्धार्थ कावरे,राजेंद्र गरड आदी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ कचरे यांनी केले तर आभार अमोल अभंग यांनी मानले.