आज पासून वरखेडच्या श्रीलक्ष्मी देवीच्या यात्रेस प्रारंभ..

आज पासून वरखेडच्या श्रीलक्ष्मी देवीच्या यात्रेस प्रारंभ..
नेवासा प्रतिनिधी –
वरखेडच्या श्रीलक्ष्मी देवीची आज मंगळवारी ७ एप्रिल रोजी यात्रा भरली असून यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
यंदा यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी १६ सीसीटीव्ही कमेरे मंदिर परिसरात लावण्यात आले असल्याचे देवस्थानचे कडूपाटील गोरे यांनी सांगितले.
मंगळवार दि.७ एप्रिल रोजी मुख्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे. मंगळवार यात्रेनिमित्त छबीना व प्रेक्षणीय शोभेचे दारुकाम होणार असून नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी यंत्रणा बंदोबस्तासाठी सज्ज केली आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे पोलिसांचे बारकाईने लक्ष असणार असल्याचे त्यांनी सांगितले .
मंगळवार दि.७ रोजी सकाळी ११ वाजता पैठण येथून कहार व भोई समाजाने आणलेल्या पालखीची पूजा ट्रस्टी व गावकरी यांच्या वतीने करण्यात येईल.
यात्रेनिमित्त जादा बसगाड्यांची व्यवस्था नेवासा एसटी डेपो च्या वतीने करण्यात आली असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष कडूपाटील गोरे यांनी सांगितले.
भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष कडूपाटील गोरे, उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे, सचिव राजू शिरसाठ, सहसचिव रंगनाथ पवार, खजिनदार रावसाहेब कुंढारे, विश्वस्त रामदास गोरे, सुरेश हारदे, नवनाथ वाघ, रामचंद्र कुंढारे, किशोर शिरसाठ, सुरेश शिरसाठ, भगवान जगधने, देविदास शिरसाठ, बाळासाहेब शिरसाठ यांनी केले आहे.




