Breaking
ई-पेपरराजकिय

*नेवासा मतदारसंघातील विकासकामांसाठी मंत्रालयात आमदार विठ्ठलराव लंघे यांचा जोरदार पाठपुरावा*

*सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते, वीज, जलसंधारणासह पाणंद रस्त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले*

0 9 5 0 2 3

*नेवासा मतदारसंघातील विकासकामांसाठी मंत्रालयात आमदार विठ्ठलराव लंघे यांचा जोरदार पाठपुरावा*

*सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते, वीज, जलसंधारणासह पाणंद रस्त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले*

नेवासा तालुका :

नेवासा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना गती मिळावी तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले स्थानिक प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मंत्रालयात विविध विभागांच्या मंत्र्यांची भेट घेत विकासकामांसाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मंजुरीबाबत जोरदार पाठपुरावा केला.

यावेळी जलसंपदा मंत्री तथा सिंहस्थ कुंभमेळा समितीचे अध्यक्ष गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर तसेच राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध मागण्यांची निवेदने सादर करण्यात आली.

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर घोडेगाव–कुकाणा रस्त्यासह श्री क्षेत्र शनिशिंगणापूरला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर शनिशिंगणापूर येथे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पार्किंग व्यवस्था आणि आवश्यक अनुषंगिक सुविधांच्या विकासासाठीही शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार लंघे यांनी केली.

नेवासा तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या प्रश्नावरही मंत्रालयात लक्ष वेधण्यात आले. घोडेगाव व सोनई येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रांशी संबंधित विद्युत यंत्रणेची देखभाल, दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्याबरोबरच तामसवाडी, रांजणगाव आणि खुपटी येथे नवीन विद्युत उपकेंद्रे मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

मृद व जलसंधारण विभागाकडे नेवासा तालुक्यातील विविध गावांमधील नाले खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. पावसाचे पाणी अडवून ते स्थानिक पातळीवर अधिकाधिक उपयोगात आणण्यासाठी ही कामे महत्त्वाची असल्याचे आमदार लंघे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत प्रतिकिलोमीटर १५ लाख रुपयांच्या मर्यादेत दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते उभारण्यासाठी सध्याचे मुरूम व ग्रॅव्हलचे दर, वाहतूक खर्च तसेच आवश्यक तांत्रिक निकषांमध्ये सुधारणा करण्याची मागणीही करण्यात आली. वाढत्या बांधकाम खर्चाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध निधीत शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना टिकाऊ पाणंद रस्ते मिळावेत, यासाठी नियमांमध्ये व्यवहार्य बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेवासा मतदारसंघातील विकासकामांना केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न ठेवता त्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून निधी व प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देऊन ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे