Breaking
ई-पेपरराजकिय

*कुकाणा येथे २५ नोव्हेंबर रोजी भव्य नोकरी मेळावा तसेच लाडक्या बहिणींसाठी शासकीय योजना मेळाव्याचे आयोजन*

0 6 0 4 8 0

*कुकाणा येथे २५ नोव्हेंबर रोजी भव्य नोकरी मेळावा तसेच लाडक्या बहिणींसाठी शासकीय योजना मेळाव्याचे आयोजन*

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

येथे येत्या २५ नोव्हेंबर रोजी भव्य नोकरी मेळावा आणि विविध शासकीय योजनांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याबद्दल स्थानिक युवक-युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हा उपक्रम *माननीय श्री. अब्दुल भैया शेख* यांच्या सौजन्याने आयोजित होत आहे.

तालुक्यासह परिसरातील सुशिक्षित युवकांच्या सशक्तीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात देशातील अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. रोजगाराच्या विविध पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रियाही याच ठिकाणी पार पडणार आहे. तसेच उपस्थित युवकांना विविध शासकीय योजनांची माहिती कार्ड वाटप, जॉब कार्ड वाटप, आरोग्य कार्ड वाटप वितरण, मोफत KYC, शेती अनुदान तसेच नुकसान भरपाई,डोल व कूपन साठी विशेष टेबल लावण्यात येणार आहे.
भैय्या सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने हा मेळावा साई श्रद्धा लॉन्स, कुकाणा येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे. अधिकाधिक युवक-युवतींनी व लाडक्या बहिणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी आणि तरुणांना दिशा देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन महत्त्वाचे ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे