सोनपेठ शहरात झालेल्या पाच वर्षीय चिमुर्डीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा
कहार समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन..

सोनपेठ शहरात झालेल्या पाच वर्षीय चिमुर्डीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा
कहार समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन..
शेवगाव | एम.के.लाकडे(महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
बदलापूर येथील घटना नुकतीच ताजी असतानाच अशीच एक घटनेची पुनरावृत्ती परभणी जिल्ह्यातील सोनपेठ या ठिकाणी घडली आहे. दिनांक ०५/१०/२०२४ रोजी सोनपेठ जिल्हा परभणी सोनपेठ शहरात एल.आर.के इंग्रजी मीडियम शाळेत कहार भोई समाजाच्या ५ वर्षीय मुलीवर शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. सदर व्यक्ती ही प्रौढ असून समाजातील माणुसकीला काळीमा फासेल असे कृत्य या नधमाणे केले आहे. या नराधमाला त्वरित अटक करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या समाज बांधवांकडून करण्यात येत आहे. या आरोपींना राजकीय पाठबळ मिळत असल्याने या चिमुकल्यांना न्याय मिळणे कठीण होत चालले आहे. या गंभीर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने या आरोपींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.सदरील बालिका केवळ पाच वर्षाची असून आज अशा प्रकारच्या घटना संपूर्ण महाराष्ट्रभर घडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या आरोपींना फाशीची शिक्षा मिळणे अपेक्षित आहे मात्र या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस अद्याप अटकही केली नाही. सदर आरोपीला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे तसेच एल. आर.के. इग्लिश मिडीयम शाळेच्या सर्व कर्मचारी वर्गावर व सस्थापकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अन्यथा कहार, भोई, भिल्ल समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर जन आक्रोश आंदोलन उभारण्यात येईल अशा आशयाचे निवेदन तहसीलदार साहेब शेवगाव तसेच पोलीस निरीक्षक साहेब शेवगाव यांना कहार समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले.यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ रासने,कहार समाज युवा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष लाकडे, दीलीपभाऊ सुपारे कार्याध्यक्ष रामदास लिंबोरे,लक्ष्मण लिंबोरे,अमोलभाऊ जिरे,विलास भंडारे,अमोल कंदे,सुयश शिंदे,राहुल परसैय्या,ऋषी गरोटे, भागवत बडे,योगेश झेंडे,सचिन बलैय्या,प्रकाश लाकडे,गोकुळ परदेशी,विजय पिटेकर,लहू परसैया ,अभय रसाळ,मंगेश जिरे,गोटू जिरे आदी उपस्थित होते.