Breaking
ई-पेपर

*महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना ग्रामीण भागासाठी उपयुक्त : डॉ. अशोकराव ढगे*

0 9 5 0 2 3

*महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना ग्रामीण भागासाठी उपयुक्त : डॉ. अशोकराव ढगे*

नेवासा तालुका प्रतिनिधी –

माळेवाडी खालसा : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेली महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असून, या योजनेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केले.

नेवासा तालुक्यातील माळेवाडी खालसा येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने महिला शेतकरी प्रमाणपत्र योजनेबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती कीर्ती सूर्यवंशी यांनी गावातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन महिलांना योजनेची सविस्तर माहिती दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती सूर्यवंशी म्हणाल्या की, शासनाने ‘शेती करणे’ या संकल्पनेची व्याख्या अधिक व्यापक केली असून त्यामध्ये मत्स्यबीज निर्मिती, बियाणे उत्पादन व बीजप्रक्रिया, रेशीम उद्योग तसेच विविध शेतीपूरक व ग्रामीण व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेती व शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया समजावून सांगताना त्यांनी प्रथम अर्ज करणे, त्यानंतर आधार कार्ड व केवायसी नोंदणी करणे, आपण करीत असलेल्या शेतीविषयक व शेतीपूरक कामांची माहिती भरणे आणि अंतिम पडताळणी करून ॲपवर अर्ज सादर करणे, या चार टप्प्यांची माहिती महिलांना दिली.

महिला शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना शेती व शेतीपूरक व्यवसायामध्ये अधिकृत ओळख मिळण्यास या उपक्रमाची मदत होणार आहे.

यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी दिगंबर लोखंडे, प्रगतशील शेतकरी सागर जाधव, दिनेश चांदगुडे, सचिन मुळे, सुनील मुळे तसेच महिला शेतकरी श्रीमती भारती चांदगुडे व वर्षा चांदगुडे उपस्थित होत्या.

प्रवरा संगम परिसरात महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असल्याबद्दल डॉ. अशोकराव ढगे यांनी कृषी विभागाच्या उपक्रमाचे कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे