Breaking
ई-पेपर

*सुजाता इंटरनॅशनल स्कूल मध्ये इंटरनॅशनल योगा दिन साजरा*

0 8 9 9 8 9

*सुजाता इंटरनॅशनल स्कूल मध्ये इंटरनॅशनल योगा दिन साजरा*

प्रतिनिधी-   मोहन शेगर सोनई

सोनई येथील सुजाता इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज स्कूलमध्ये नॅशनल योगा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फिटनेस अँड वेलनेस कोच सौ पूनम लकडे मॅडम, तसेच ॲड सुनील गडाख सर उपस्थित होते. तसेच स्कूलचे संस्थापक किरण सोनवणे सर आणि मुख्याध्यापिका ज्योती मॅडम या ही उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. स्कूलचे संस्थापक किरण सर यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्याची सत्कार केला. त्यानंतर योगा टीचर श्री अँड सुनील गडाख सर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या भाषणांमध्ये मार्गदर्शन केले व योगाचे महत्त्व पटवून दिले तसेच सौ. पूनम लकडे यांनी देखील चांगले मार्गदर्शन केले. त्यानंतर योगाचे काही प्रकार मुलांसमोर सादर करून त्यांनी निरोगी राहण्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री सचिन चांडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या शिक्षिका स्वाती गडाख मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन पल्लवी सोनवणे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे