Breaking
ई-पेपर

तालुक्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना माजी आमदार मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली1100 ग्रहउपयोगी संचाचे वितरण..

0 4 0 5 3 3

तालुक्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना माजी आमदार मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली1100 ग्रहउपयोगी संचाचे वितरण..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व बांधकाम कामगार मंत्री नामदार सुरेशजी खाडे साहेब यांच्या नेतृत्वातून जय हरी आमदार श्री बाळासाहेब मुरकुटे यांच्या नियोजनातून
इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार योजनेच्या 1100 लाभार्थ्यांना भेंडा येथे श्रीकृष्ण मंगल कार्यालयामध्ये ग्रह उपयोगी संचाचे वितरण नुकतेच करण्यात आले, प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे तसेच
कार्यक्रमास प्रमुख अतिथी गुजरात गांधीनगरचे पक्षनिरीक्षक मा. नैलेशजी शाहा ,विधानसभा प्रभारी श्री बाळासाहेब गाडेकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे,डॉ बाळासाहेब कोलते,भाजपा तालुका अध्यक्ष श्री भाऊसाहेबजी फुलारी,उपाध्यक्ष सोमनाथ कचरेजिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब गव्हाणे, कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष श्री विवेकजी नन्नवरे, शहराध्यक्ष रोहित पवार, सरचिटणीस शरद जाधव,श्री अमोल दिघे,श्री सागर पुंड, प्रवीण मोरे, अप्पासाहेब कावरे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी बाळासाहेब मुरकुटे मार्गदर्शन करताना म्हणाले
बांधकाम कामगार हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि तुटपुंजा पगारावरती तो आपला उदरनिर्वाह करत असतो. शासनाने बांधकाम कामगाराची दखल घेऊन त्यांना ही योजना चालू केली. बांधकाम कामगार कार्ड आरोग्य कार्ड कामगार पेटी गृह उपयोगी संच व शैक्षणिक सवलत या सर्व घटकामुळे बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळाला, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृवात महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांनी गोर गरिबांसाठी भरपूर कल्याणकारी योजना राबवल्या त्या मुळे आपल्याला पुन्हा या योजना चालू रहाव्यात म्हणून सरकारचे हात बळकट करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असल्याचे मुरकुटे म्हणाले.
कल्याणकारी योजनेचा नेवासा तालुक्यामध्ये सर्व बांधकाम कामगारांनी लाभ घेण्याचे आवाहन मुरकुटे यांनी केले.प्रसंगी मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे