Breaking
ई-पेपरराजकिय

सौंदाळा सरपंचांचे ग्रामस्थांसह वडाळा ते सौंदाळा रस्ता डांबरीकरणासाठी उपोषण सुरु*

0 4 0 5 3 3

*सौंदाळा सरपंचांचे ग्रामस्थांसह वडाळा ते सौंदाळा रस्ता डांबरीकरणासाठी उपोषण सुरु*

नेवासा प्रतिनिधी –  महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा 

नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावचे सरपंच शरदराव आरगडे यांनी वडाळा ते सौंदाळा रस्ता तातडीने डांबरीकरणणाचे काम करण्यासाठी सौंदाळा ग्रामपंचायत कार्यालयातच उपोषण सुरु केले आहे

उपाभियंता सार्वजनिक बांधकाम नेवासा यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की वडाळा ते सौंदाळा रस्ता मागील ५ वर्षा पासून मंजूर आहे तरीही सौंदाळा हद्दीत दिड की मी रस्त्याचे काम केलेलं नाही त्यामुळे सदरच्या कामाच्या ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली नाही

काही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण ठेवलेले आहे
तसेच सौदाळा हद्दीत खूप मोठया प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे

तसेच रांजणगाव येथे मागील १० वर्षांपासून पासून खडी क्रेशर आहेत त्यामुळे कधीच रस्ता खराब झाला नाही परंतु फक्त ८ ते १० महिन्यात झालेले   क्रेशरच्या खडीच्या अवजड बेकायदेशीर वाहतुकीमुळे संपूर्ण रस्ता खड्डामय झालेला आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे

सदर रस्त्याबाबत आता पर्यंत ५ ते ६ वेळेला आपल्याला लेखी निवेदन व अनेक वेळेला तोंडी चर्चा केलेली आहे परंतु आपण कुठलीच याबाबत कारवाई केलेली नाही म्हणून शुक्रवार दि ४/१०/२०२४ रोजी ११ वा प्रशासनाच्या सोईच्या व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सौंदाळा ग्रामपंचायत कार्यालयात आमरण उपोषण स्वतः शरदराव आरगडे करत असून ग्रामस्थांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे

सार्वजनिक बांधकाम उपअभियंता श्री खेडेकर व ठेकेदार पराग गुंड यांच्याशी केलेल्या चर्चेतून मार्ग न निघाल्याने शरदराव आरगडे यांनी उपोषण सुरु केले आहे

यावेळी सचिन आरगडे, लक्ष्मण आरगडे, गणेश आरगडे, बाबासाहेब बोधक, अमोल आरगडे, हरिभाऊ आरगडे, मनोज आरगडे, हनुमान आरगडे,अविनाश आरगडे, ज्ञानदेव आरगडे,संजय गोरे, मंजु आढागळे,आदी ग्रामस्थ उपस्थित आहेत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे