Breaking
ई-पेपर

आहिल्यानगर शहरात रविवारी सकल मराठा समाजाचा वधु-वर, पालक परिचय मेळावा

0 4 0 5 3 7

आहिल्यानगर शहरात रविवारी सकल मराठा समाजाचा वधु-वर, पालक परिचय मेळावा

नगर (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

आहिल्यानगर (अहमदनगर)येथे रविवारी (दि.२०) सकाळी १० वाजता सकल मराठा समाजाचा वधु-वर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राज्यभरातून अहमदनगर बीड, औरंगाबाद, जालना, सोलापूर,पुणे, मुंबई,नाशिक इ.जिल्ह्यातून सुमारे शेकडो वधू-वर व त्यांचे पालक येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

अहिल्यानगर (अहमदनगर) शहरातील सावेडी उपनगरातील वृंदावन गार्डन, हॉटेल संजोग शेजारी,नगर-मनमाड रोड, सावेडी आहिल्यानगर (अहमदनगर)येथे हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याचे आयोजन सगेसोयरे विवाह संस्था,मॉ जिजाऊ वधु-वर व्हाटसअप ग्रृप,सकल मराठा वधूवर ग्रुप, राजमाता जिजाऊ वधूवर ग्रुप च्या माध्यमातून या मेळाव्याचे आयोजन केले असून, सगेसोयरे विवाह संस्थेच्या सर्व सहकार्यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्वदूर संपर्क दौरा केला आहे. पाहणी संपर्क परिचयातून मेळाव्यातच २० ते २५ विवाह मार्गी कसे लागतील, यासाठीसुध्दा आयोजकांचा प्रयत्न असणार आहे.
या शिवाय, या मेळाव्यात विवाहासाठी समुपदेशन, वधु-वर परिचय, विवाह संस्कार महत्त्व, उपवर मुले मुली व संबंधित पालकांना समुपदेशन, विवाहात येणारी अडथळे, विवाह समस्यांवर मार्गदर्शन, उपवर मुले, मुली यांना विवाह ठरवताना घ्यावयाची काळजी व त्यावर मार्गदर्शन तसेच अविवाहित, घटस्फोटीत, विधवा, विधुर यांच्यासाठी स्थळे उपलब्ध असून, विवाह पूर्व व विवाहोत्तर येणाऱ्या समस्यांवर पालक कुटुंबीयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी आ.संग्रामभैय्या जगताप, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ, माजी विरोधीपक्ष नेते संपतदादा बारस्कर, नगरसेवक कुमारभाऊ वाकळे,माजी शिक्षण संचालक दिनकर टेमक, सौ.मायाताई जगताप यांची उपस्थिती राहणार असून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. वधु व वरांचा परिचयाबरोबरच कुंडली गुणमिलन, नाडीदोष,ब्लडग्रुप, मंगळ इ.अंधश्रध्दावरील शास्रीय मार्गदर्शन याबाबतही मान्यवर समाजाला प्रबोधन करणार आहेत. पालकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी शेकडो स्थळे पाहण्याची/ प्रत्यक्ष भेटण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नावे नोंदविण्यासाठी वधु-वर व पालक मेळावा समितीमधील स्वयंसेवक सदस्य हे प्रयत्न करत आहेत. वधू-वर व पालक यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन सगेसोयरे विवाह संस्थेचे हरिभाऊ जगताप, लक्ष्मण मडके, नंदाताई वराळे यांनी केले असून अधिक माहितीसाठी 9689047270 / 9822751151 / 9890437808 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन आयोजक समितीतर्फे करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे