किड्स किंग्डम, कुकाणा विद्यालयात देशाचा ७८ वा स्वतंत्रता दिवस उत्सहात साजरा..
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..
किड्स किंग्डम, कुकाणा विद्यालयात देशाचा ७८ वा स्वतंत्रता दिवस उत्सहात साजरा..
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..
कुकाणा प्रतिनिधी –
किड्स किंग्डम, कुकाणा विद्यालयात देशाचा ७८ वा स्वतंत्रता दिवस उत्सहात साजरा करण्यात आला.
विद्यालयात निवृत्त सैनिक मेजर मछिंद्र तांबे,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर तसेच मेजर अनंत देशमुख , माजी शिक्षक जालिंदर सरोदे, पोलीस पाटील मीनाक्षी रिंधे यांची प्रमुख उपस्थिती होती,प्रसंगी विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, मेजर अनंत देशमुख व बाळासाहेब ताके यांनी विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप केले.
हनुमंत फटाले व महादेव जाधव शिक्षकांनी उपस्थित प्रमुख मान्यवरांचे सत्कार केले,
या प्रसंगी अनिता बडे प्रतिभा कदम,सोनाली जामदार,कोमल म्हस्के, पूजा पवार आदी शिक्षिका कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी विद्यार्थी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.