कुकाण्यात विविध ठिकाणी देशाचा ७८ वा स्वतंत्रता दिवस उत्सहात साजरा..
कुकाण्यात विविध ठिकाणी देशाचा ७८ स्वतंत्रता दिवस उत्सहात साजरा..
कुकाणा प्रतिनिधी -( महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
कुकाणा येथे देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, कुकाणा ग्रामपंचायत प्रांगणात तसेच जिल्हा परिषद शाळा कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, किड्स किंगडम विद्यालय, श्री गणेशा पब्लिक स्कुल,आदी ठिकाणी विविध उपक्रम राबवत ध्वजारोहण करण्यात आले. कुकाणा ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत सदस्या अनुराधा निकम तसेच, जिल्हा प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास गरड तर कुकाणा माध्यमिक विद्यालयात माजी उपसरपंच भाऊसाहेब फोलाने, किड्स किंगडम विद्यालयात निवृत्त सैनिक मेजर मछिंद्र तांबे श्री गणेशा पब्लिक स्कुल येथे डॉ. कारभारी नरवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत प्रांगणात जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच गावातील सामाजिक कार्यात मदत करणाऱ्याचा गौरव सत्कार करून करण्यात आला या वेळी ग्रामपंचायत कुकाणा,समृद्धी पतसंस्था,व्यंकटेश मल्टीस्टेट, यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा. व्हाईस चेअरमन देसाई देशमुख, राष्ट्रवादी काँगेस चे युवक नेते अब्दुल हफिज शेख, सरपंच लता अभंग उपसरपंच शुभांगी कचरे, माजी सरपंच एकनाथराव कावरे, मार्केट कमिटीचे संचालक दौलतराव देशमुख, माजी सभापती अशोकराव मंडलिक अमोल अभंग,भाजपचे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ कचरे, माजी उपसरपंच भाऊसाहेब फोलाने, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील जाधव,मनसेचे विलासराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्या सुजाता देशमुख, छाया गोर्डे, शिवगंगा सदावर्ते, हकीमाबी शेख,मछिंद्र भोसले, उमेश सदावर्ते,कारभारी गोर्डे,सुनील गोर्डे, रज्जाक इनामदार, इकबाल इनामदार, जेष्ठ नागरिक विष्णुपंत पवार, सुभाष चौधरी, समीर पठाण, राजेंद्र गरड, अरुण उंडे,उदयोजक सिद्धार्थ कावरे अशोकराव भूमकर, नामदेव उंडे,कांताराम दरंदले, वसंत गरड, अप्पासाहेब कावरे, पांडुरंग कावरे,जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक व्यवस्थापन कमिटीचे सर्व सदस्य आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक कर्मचारी,गावातील विविध क्षेत्रातील मन्यावर तसेच कुकाणा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार ग्ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आगळे यांनी मानले.