महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचा हस्ते संतपूजन व सन्मान सोहळा संपन्न…
महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचा
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचा हस्ते संतपूजन व सन्मान सोहळा संपन्न…
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
आळंदी येथे देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचा हस्ते संतपूजन व सन्मान सोहळा संपन्न झाला,
यावेळी देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज बोलताना म्हणाले की आपल्या गोमातेची तसेच देशातील भगिनीची खूप क्रूर चेष्टा चालू आहे देवधर्माच्या बद्दल बोलले तरीही त्याना तुरुंगात जावे लागते आमच्या शेजारच्या देशाने संतांना तुरुंगामध्ये घातले आहे.
भारत देशाची जी विचारसरणी आहे ती इतर कोणत्याही देशाची नाही आपल्याला सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे धर्माचे जे विरोधक असतील त्यांना सुबुद्धी व्हावी हे चाललेल्या सर्व वाईट काम त्यांनी थांबावे् असे त्यांना विनंती करतो.
गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज पुढे बोलताना म्हणाले की संतांनी अद्यापही कधी कुठल्याही निवडणुकी मध्ये भाग घेतला नाही परंतु यावेळी कोणीही मागेपुढे न बघता धर्म वाचवण्यासाठी निवडणुकीमध्ये सहभागी झाले.
यावेळ देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे तोंड भरून कौतुक केले तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेही त्यांनी मनपूर्वक अभिनंदन व कौतुक त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
पुढे बोलताना गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज म्हणाले की आपल्या सर्व मंत्रिमंडळांना नेतेगणांना काम करताना खूप त्रास होतो परंतु धर्माला अधीन राहून आपण हे काम करावे काम करताना जे जे सार्वजनिक कामे आहेत ते तुम्ही करा आम्ही आमच्यासाठी वैयक्तिक काही मागत नाही तसेच पहिले आमच्या गोमाते रक्षणाकडे लक्ष द्या हे त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनवणी केली तसेच आपण भारतामध्ये पहिला दर्जा महाराष्ट्र मध्ये गोमातेला राष्ट्रमाता म्हणून दीला ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे.
पाचशे वर्षे अयोध्या राम मंदिराच्या उभारणीसाठी आपण कलंक सहन केला ज्यावेळी आम्ही राम मंदिराच्या त्या काळामध्ये राम मंदिराचे रक्षण करीत होतो त्यावेळी विरोधी मंडळी आम्हाला गोळ्या घालत होते आसूडाने मारत होते हे सर्व संतांनी सहन केले व आज आपल्या राज्यकर्त्यांच्या सहकार्याने राम मंदिर उभे राहिले हिंदू धर्म हा
सनातन धर्म आहे राष्ट्राच्या व हिंदू धर्माचे स्वाभिमान करण्यासाठीचे संताचे काम आहे आणि ते संत करत राहतील.
देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज हे आळंदी येथे संत संमेलन व संतपूजन सोहळा प्रसंगी बोलत होते.




