Breaking
ई-पेपरब्रेकिंग

माजी मंत्री शंकरराव गडाख क्रांतिकारी शेतकरी पक्षावर निवडणुका लढवणार

पक्ष प्रवेशच्या चर्चा थांबल्या..

0 6 0 4 8 0

माजी मंत्री शंकरराव गडाख क्रांतिकारी शेतकरी पक्षावर निवडणुका लढवणार

पक्ष प्रवेशच्या चर्चा थांबल्या..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात माजी मंत्री शंकरराव गडाख हे महायुती च्या कोणत्याही पक्षात प्रवेश करतील अशा खमंग चर्चा चालु असताना मात्र गडाख यांनी होऊ घातलेल्या नगर पंचायत तसेच स्थानिक स्वराज्य संस्था ह्या क्रांतिकारी शेतकरी पक्षावर लढवणार असल्याचे खात्रीशीर संकेत सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्याने, पक्ष प्रवेशच्या चर्चा मात्र आत्ता तरी थांबल्या आहेत. गडाख यांनी मागील जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या चिन्हावर लढवत जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा झेंडा फडकवला होता, नंतर २०१९ ला त्यांनी विधानसभेत क्रांतिकारी पक्षावर निवडणूक लढवत मोठे यश मिळवले,महाविकास आघाडी समाविष्ट होऊन त्यांना शिवसेने कडून कॅबिनेट मंत्रिपद देखील मिळाले होते,
मात्र नंतर २०२४ला मात्र त्यांनी शिवसेना उबाठा गटाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली त्यात त्यांचा विठ्ठलराव लंघे यांनी पराभव केला, मात्र आता त्यांनी पुन्हा क्रांतिकारी शेतकरी पक्षावर निवडणूक करण्याचे ठरवले असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा चालु आहे, येणाऱ्या काळात या निर्णयाने कितपत यश मिळेल हे पाहाव्यास मिळणार आहे, त्या मुळे राजकीय समीकरणे मात्र बदलणार असून गडाख विरुद्ध महायुती असा सामना होईल असे जानकरांचे मत आहे.

4/5 - (3 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे