Breaking
ई-पेपर

*प्राजक्ता कचरे यांच्या यशाचे माजी मंत्री शंकरराव गडाखांकडून कौतुक; निवासस्थानी भेट देत केले अभिनंदन*

0 8 9 9 1 9

*प्राजक्ता कचरे यांच्या यशाचे माजी मंत्री शंकरराव गडाखांकडून कौतुक; निवासस्थानी भेट देत केले अभिनंदन*

नेवासा तालुका प्रतिनिधी :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट-ब परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत एकाच वेळी तीन शासकीय पदांसाठी निवड झालेल्या कु. प्राजक्ता संजय कचरे यांची माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी कुकाणा येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले. प्राजक्ता यांनी मिळविलेले यश हे त्यांच्या मेहनतीचे, सातत्यपूर्ण अभ्यासाचे आणि जिद्दीचे फलित असल्याचे सांगत गडाख यांनी त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राजक्ता कचरे यांची दुय्यम निबंधक श्रेणी-१, कर उपनिरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी या तीन महत्त्वाच्या पदांसाठी निवड झाली आहे. एकाच परीक्षेच्या माध्यमातून तीन शासकीय पदांसाठी पात्र ठरण्याची त्यांची कामगिरी विशेष कौतुकास्पद मानली जात आहे.
प्राजक्ता कचरे यांची भेट घेताना शंकरराव गडाख यांनी त्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे गांभीर्याने पाहून सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, यासाठी प्राजक्ता यांचे यश निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी गडाख यांनी प्राजक्ता यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अभ्यासाची तयारी, स्पर्धा परीक्षेतील अनुभव आणि पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. तीन शासकीय पदांसाठी मिळालेले यश हे केवळ एका विद्यार्थिनीचे वैयक्तिक यश नसून कुकाणा परिसरातील विद्यार्थ्यांसाठीही अभिमानाची आणि प्रेरणेची बाब असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

1/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे