*कामिका एकादशीनिमित्त ज्ञानेश्वर मंदिरात भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप*
खिचडी प्रसादाचे वाटप* *मा. मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने सेवाभावी उपक्रम; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी*

*कामिका एकादशीनिमित्त ज्ञानेश्वर मंदिरात भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप*
*मा. मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने सेवाभावी उपक्रम; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी*
नेवासा | प्रतिनिधी :
कामिका एकादशीनिमित्त नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात रविवारी (दि. ९ ऑगस्ट) दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मा. मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. एकादशीनिमित्त मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी खिचडी प्रसादाचा लाभ घेतला.
कामिका एकादशीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दूरवरून आलेल्या भाविकांसह स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. भाविकांच्या सेवेसाठी आयोजित करण्यात आलेल्या खिचडी प्रसाद वाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी श्री ज्ञानेश्वर देवस्थानचे महंत वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, महंत प्रकाशानंदगिरी महाराज, देवस्थानचे अध्यक्ष मा. आ. पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वासराव गडाख, कैलासराव जाधव, मुळा कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब मोटे, व्हा. चेअरमन बाळासाहेब पाटील, लक्ष्मणराव जगताप, संतोष फिरोदिया, अशोकराव नांगरे, मच्छिंद्र कडू, राजेंद्र सानप, त्रिंबक सुकाळकर, दिनकर घावटे, जालु गवळी, विशाल सुरडे, कैलास काळे, बाबासाहेब मोरे, संभाजी धोत्रे, स्वप्नील मापारी, भरत काळे, पांडुरंग निपुंगे, कैलास झगरे, डॉ. राहुल चव्हाण, राजेंद्र काळे, भीमाशंकर वरखडे, महादेव तांदळे, महादेव गडाख, बबनराव नागोडे, लालचंद मते, असिफ पठाण, वसंत टेकाळे, सुनील झीने, बाळासाहेब नवले, महंमद आतार, पत्रकार विजय गांधी, बंडू नेहे, अनिल वाघ, वैभव थिटे, बाळासाहेब कोकणे, बाळासाहेब मारकळी आदी उपस्थित होते.
श्री ज्ञानेश्वर देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकादशीच्या पावन पर्वावर भाविकांची सेवा करण्याच्या या उपक्रमातून श्रद्धेसोबतच सेवाभावाची परंपरा जपली गेल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.



