Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपर

*प्रा. लक्ष्मण लोखंडे व प्रा. मीनाक्षी लोखंडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार*

*१५ वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव*

0 9 0 0 9 9

*प्रा. लक्ष्मण लोखंडे व प्रा. मीनाक्षी लोखंडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार*

*१५ वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव*

नेवासा प्रतिनिधी –

बी द चेंज फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात अभिनव आदर्श डिजिटल क्लासेसचे संचालक प्रा. लक्ष्मण लोखंडे आणि प्रा. मीनाक्षी लोखंडे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. गेल्या पंधरा वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय, गुणवत्तापूर्ण आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.
शिर्डी येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. लक्ष्मण लोखंडे व प्रा. मीनाक्षी लोखंडे यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक डिजिटल शिक्षणाची जोड देत गुणवत्तापूर्ण अध्यापनाची नवी दिशा निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे.
गेल्या १५ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही त्यांनी विशेष भर दिला. बदलत्या शैक्षणिक वातावरणाचा वेध घेत डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि शिक्षणातील नावीन्यपूर्ण उपक्रम यामुळे त्यांचे कार्य विशेष ठरले आहे.
‘अभिनव आदर्श डिजिटल क्लासेस’च्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा देण्याचे कार्य लोखंडे दाम्पत्याने केले आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक शिक्षण पोहोचविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार विशेष कौतुकास्पद ठरला.
या कार्याची दखल घेत बी द चेंज फाउंडेशनने महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार व सौंदर्य कला पुरस्कार सोहळ्यांतर्गत त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले. पुरस्कार मिळाल्यानंतर प्रा. लक्ष्मण लोखंडे व प्रा. मीनाक्षी लोखंडे यांच्यावर शिक्षण क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिक्षण क्षेत्रात निष्ठेने आणि सातत्याने कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचा राज्यस्तरावर झालेला हा गौरव निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे