
भाजप नेवासा तालुका उपाध्यक्षपदी सोमनाथ कचरे
नेवासा प्रतिनिधी – (मंगेश निकम )
तालुक्यातील कुकाणा ग्रामपंचायतीच्या
उपसरपंच शुभांगी कचरे यांचे पती सोमनाथ कचरे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून त्यांची भाजपाच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमनाथ कचरे हे आ. शंकरराव गडाख यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने आप सह आमदार शंकरराव गडाख यांना मोठा धक्का मानला जात आहे, सोमनाथ कचरे हे कुकाणा व परिसरात मोठा मित्रपरिवार तसेच तगडा जण संपर्क असणारे युवा नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे, माजी आमदार
बाळासाहेब मुरकुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब गव्हाणे, रितेश भंडारी, आप्पासाहेब कावरे, पांडुरंग कावरे, सुरेश लिपणे अरुण गरड, भागवत खराडे, विकास भागवत, अण्णासाहेब गव्हाणे बाळासाहेब क्षीरसागर, मच्छिंद्र कचरे अंबादास म्हस्के आदी उपस्थित होते.