
महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी शनि देवाने आम्हाला दिली -:मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नेवासा तालुक्यातील जागृत देवस्थान असलेले शनि शिंगणापूर देवस्थान येथे आज शनि देवाच्या दर्शनासाठी आले होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की मी पहिले शनि देवाचे आभार मानले शनि देवाच्या कृपाशीर्वादाने आम्हाला महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली .
शनिशिंगणापूरला मी वर्षानुवर्ष येत आहे तसेच सर्वांचीच इच्छा असते की शनि देवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा शनी देवाचे मी आभार मानले आहे की महाराष्ट्राचे सेवा करण्याची संधी आम्हाला त्यांनी मिळवून दिली. मी शनि देवाला आशीर्वाद मागितला की या मिळालेल्या संधीचे सोने करण्याची शक्ती त्यांनी आम्हाला द्यावी असे मुख्यमंत्री फडवणीस बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना बीड खून प्रकरणाबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की पोलीस योग्य कारवाई करीत आहेत तसेच त्या मधून कोणीही सुटणार नाही फडवणीस हे शनिशिंगणापूर येथे माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री शनेश्वर भगवंताचे दर्शन घेऊन उदासी महाराज मठात अभिषेक करण्यात आला यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आमदार शिवाजीराव कर्डिले नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव
वकीलराव लंघे पाटील, अंकुश काळे ऋषिकेश शेटे प्रताप शिंदे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले त्यावेळी जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले तर शनिशिंगणापूर हेलिपॅड येथे आमदार शिवाजीराव कर्डिले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी त्यांचे स्वागत केले.