भूलथापांना बळी पडू नका पुन्हा एकदा राज्यात महायुतीचाच झेंडा फडकणार – विठ्ठलराव लंघे

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
वाकडी येथे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मार्ग व पूल०२ ग्रामीण रस्ते लेखाशीर्ष ३०५४ या योजने अंतर्गत मंजूर झालेले मौजे वाकडी ते गोपाळपूर (पोटे वस्ती) रस्ता निधी (३० लक्ष रुपये )उद्घाटन समारंभ जिल्हाध्यक्ष मा.श्री.विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते पार पडला….
यावेळी मा.आ.श्री. बाळासाहेब मुरकुटे तालुकाध्यक्ष मा.श्री. भाऊसाहेब फुलारी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष मा.श्री.अंकुशराव काळे मा.श्री.प्रताप चिंधे मा.श्री.नवनाथ साळुंके मा. सरपंच.श्री.दत्तूनाना पोटे सरपंच मा.श्री. शिवाजी जाधव मा. सरपंच श्री.बंडूभाऊ गायकवाड चेरमन.श्री.महेश जाधव श्री.सुरेश वाघ श्री.अजय काळे श्री.अंकुश काळे श्री.अण्णा जाधव श्री.कडू पाटील काळे श्री.अशोक जवादे श्री.सोमनाथ असणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे बोलताना म्हणाले की
नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी अधिवेशन सुरू असताना अधिवेशनाला पाठ फिरवून घोंगडी बैठका घेऊन तालुक्यातच फिरले.
पाच वर्ष मतदार संघात फिरकले देखील नाही आता तुम्हाला खूप काही आश्वासनांची खैरात होईल त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका पुन्हा एकदा राज्यात महायुतीचाच झेंडा फडकणार तालुक्यात भाजपचाच आमदार निवडून द्या विकास कामांना गती मिळेल असे आव्हान विठ्ठलराव लंघे यांनी कार्यकर्त्यांना केले .
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की तालुक्यात शेतकरी वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे परंतु शेतकऱ्यांनी त्यांना घाबरू नका कारण अनेक कारखाने नव्याने सुरुवात होत आहे त्यात स्वामी समर्थ कारखाना, पंचगंगा कारखाना, जामगाव कारखाना असेल यांच्या माध्यमातून आपली उसाचे देखील चिंता दूर झालेले आहे.
लंघे पुढे बोलताना म्हणाले तालुक्याला मंत्रीपद मिळाले पण कुठलेही प्रकारची प्रगती तालुक्याची झाली नाही किंवा विकासकामे कुठलेही प्रकारची झाले नाही.
वाकडी गावात मी असेल माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे असतील आमच्या माध्यमातून खूप काही विकास कामे झाली एक वेळ संधी द्या विकासाची गंगा तुमच्या दारात आल्याशिवाय स्वस्त बसणार राहणार नाही असे आपल्या भाषणातून भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे म्हणाले ते वाकडी येथे लेखाशीर्ष 3054 योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वाकडी ते गोपाळपूर वस्तीग्रस्त निधी 30 लक्ष रुपये खर्चाच्या रस्ता भूमिपूजन उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.