Breaking
ई-पेपरराजकिय

राष्ट्रवादी ( शरद पवार गट) युवा सेनेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी संदीप कुसळकर

0 4 0 5 3 3

राष्ट्रवादी ( शरद पवार गट) युवा सेनेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी संदीप कुसळकर यांची निवड.

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवा सेनेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी सोनई येथील सोनई ग्रामपंचायतचे माजी सरपंच संदीप अशोकराव कुसळकर यांची निवड करण्यात आली आहे . माका येथील कार्यक्रमात त्यांच्या त्यांच्या नियुक्तीचे पत्र आज संदीप अशोकराव कुसळकर यांना अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सतीशभाऊ थोरात सरपंच शिंगवे तुकाई, सोनई जवळील बेल्हेकरवाडीचे माजी सरपंच युवा नेते भरत पाटील बेल्हेकर सोनई शहराचे अध्यक्ष श्रीहरी लांडे सोनई शहराचे उपाध्यक्ष विठ्ठल शेगर, सोनई सोसायटीचे माजी संचालक दिलीप काका शिंदे, निलेश दळवी, हरिभाऊ वाकडे, पत्रकार संदीप दरंदले यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली नेवासा तालुक्यामध्ये संदीप कुसळकर यांचे तरुण कार्यकर्त्यांमध्ये संपर्क मोठा असून त्यांच्यामुळे शरद पवार गटाची नेवासा तालुक्यात ताकत वाढणार आहे. कुसळकर यांचे संघटन कौशल्य चांगले असून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करून न्याय देण्यासाठी कधीही मागे न हटणारा नेता अशी त्यांची ओळख आहे, दरवर्षी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गोरगरिबांना प्रत्येक शासकीय कार्यालयात अडचणी असल्यास त्या ठिकाणी कॅम्प घेणे व त्यातून गोरगरिबांचे प्रश्न सोडवणे असे संदीप कुसळकर यांचे कार्य करीत आहे. विशेष म्हणजे 2019 झाली कोरोणाच्या काळामध्ये जीवाची पर्वा न करता 24 तास गोर गरीब दिन दलीतांच्या मदतीला धावणारा नेता म्हणून संदीप अशोकराव कुसळकर व कुसळकर कुटुंबीय यांची सोनई परिसरात ओळख आहे. त्यामुळे संदीप कुसळकर यांच्या निवडीबद्दल युवक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे