Breaking
कृषीवार्ता

कुकणा येथे कृषिदुतांचे स्वागत..

0 4 0 5 3 3

कुकाणा प्रतिनिधी : (दि.10/6/2024) महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषि महाविद्यालय, सोनई कृषि पदवीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी न कुकाना या गावात दाखल झाले आहेत. दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती कृषिदूत देणार आहेत. कुकणा येथे कृषिदुतांचे स्वागत गावचे सरपंच अभंग,उपसरपंच कचरे,ग्रामसेवक आगळे बी. एन.साहेब तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व गावकऱ्यांनी केले. कृषि पदवीच्या अभ्यासक्रमाच्या अतंर्गत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण कृषि जागरूकता हा प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवणार येतो, यादरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांचे जीवनमान, सामाजिक आर्थिक स्थर, साक्षरतेचे प्रमाण, संबंधित गावातील पीक पद्धती, नैसर्गिक संसाधने अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. तसेच माती परीक्षण व पाणी परीक्षण, विविध पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन, हवामान सल्ला, बाजार भाव व आधुनिक तंत्रज्ञान या बद्दल माहिती देणार आहेत. कृषि औद्योगिक कार्यक्रमांतर्गत शेवटच्या चार आठवड्यामध्ये विद्यार्थी कृषि आधारित व्यवसाय किंवा उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेणार आहेत, तसेच कुकाणा या गावामध्ये कृषि महाविद्यालय सोनई, अतंर्गत ग्रामीण भागातील तरूणांना कृषि-क्षेत्रातील विविध प्रकारच्या योजना तसेच त्याबद्दल २ दिवस कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.जी.मोरे, उप-प्राचार्य एस.व्ही.बोरुडे,कार्यक्रम समन्वयक डॉ.अतुल ए. दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.एस. गोंधळी व इतर विशेषज्ञ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती कृषिदुत कु.प्रणव देवकर यांनी दिली, यावेळी इतर कृषिदुत कु.अजित भंडारे, कु.अविष्कार भडके, कु.हर्षल खेमनर , कु.शिवम जगताप हे विद्यार्थी कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कुकाना गावामध्ये कार्यरत राहतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 3 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे