पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत
पिकांच्या मशागती थांबल्या.
नेवासा प्रतिनिधी -(मंगेश निकम )
नेवासा तालुक्यामध्ये जोरदार पावसाच्या नंतर काही कालांतराने पावसाने दडी मारल्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना धडकी भरली आहे कारण होऊन गेलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन ,मक्का ,तूर ,कपाशी, आदी पिकांची भरघोस प्रमाणामध्ये लागवड शेतकरी राजानी केली.
परंतु मोठ्या प्रमाणात पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्या वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे .
कारण आता पिके उगवून दोन- दोन पानावरती आली असून त्यांना आता खत देण्यासाठी पावसाची गरज आहे .
परंतु पाऊस नसल्यामुळे पिकांना शेतकऱ्यांना खते टाकने मुश्किल झाले आहे . त्यामुळे शेतकरी राजाची चिंता वाढल्याचे चित्र नेवासा तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे.
तरीही शेतकरी राजा नेवासा तालुक्यामध्ये आता पावसाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे पाऊस कधी येणार व शेतकरी राजाची प्रतीक्षा कधी संपणार हे पहाणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.शेतकरी वर्ग हा पाऊस पडल्यानंतर लागवडीची मोठी लगबग करताना दिसत असतो तसेच पेरणीसाठी मेहनतीसाठी कर्ज काढून आपल्या शेतामध्ये पीक खुलवण्यासाठी धडपड करत असतो परंतु पावसाने अशा प्रकारे हुलकावणी दिल्याने शेतकरी हिरमुसल्यासारखा सध्याच्या काळामध्ये पहावयास मिळत आहे शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.