Breaking
ई-पेपरकृषीवार्ता

स्वामी समर्थ शुगर अॅण्ड अॅग्रो इ.लि. महालक्ष्मीनगर कडून २८००रुपये पहिली उचल.

0 4 0 5 2 9

स्वामी समर्थ शुगर अॅण्ड अॅग्रो इ.लि. महालक्ष्मीनगर कडून २८००रुपये पहिली उचल.

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

माळेवाडी दुमाला – नेवासा तालुक्याला वरदान ठरलेल्या स्वामी समर्थ शुगर अॅण्ड अॅग्रो इ. लि. महालक्ष्मीनगर, माळेवाडी दुमाला, ता नेवासा या साखर कारखान्याने उसाला प्रथम हप्ता प्रतिटन 2800 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबर पर्यंत तुटलेल्या ऊसाचे बिल शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. अशी माहिती स्वामी समर्थ शुगर अॅण्ड अॅग्रो इ.लि. कारखान्याचे चेअरमन मा. ना. श्री. विजय (बापू) शिवतारे साहेब यांनी दिली. तसेच चांगल्या दरासाठी केंद्र सरकारने साखरेची एम.एस.पी वाढवावी, अशी मागणीही केलेली आहे. तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. सौ. ममताताई शिवतारे-लांडे मॅडम म्हणाल्या कि, कारखान्याची यशस्वी चाचणी पूर्ण करून कारखाना सुरळीत चालू झालेला आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील तसेच इतर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. आमचे कारखान्याचे आज अखेर 41000 मे. टन गाळप झालेले असून आमचे 3,00,000 मे.टन गाळप करण्याचे उदिष्ट आहे. तसेच पुढील हंगामात कारखाना वेळेवर सुरु करून गाळप क्षमता 6 ते 7 हजार मे.टन प्रती दिवस करून 11 ते 12 लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ट समोर ठेऊन उच्चांकी ऊस दर देणार आहोत. तसेच नेवासासह शेवगाव व गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या उसाला प्राधान्य देऊन न्याय देणार आहोत. त्याकरिता वरील तालुक्यातील शेतकऱ्यांनी गळीत हंगाम 2025-26 करिता जास्तीत जास्त नवीन ऊस लागवड करून तसेच खोडवा ऊसाच्या नोंदी लवकरात लवकर देऊन कारखान्यास सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे