कुकाण्यात किड्स किंग्डम अकॅडमित ७६ प्रजासात्तक दिनाच्या निमित्ताने पर्यावरण जण जागृती.
वर्षाताई भंडारी यांच्या हस्ते उत्साहात धावजारोहन संपन्न..
कुकाण्यात किड्स किंग्डम अकॅडमित ७६ प्रजासात्तक दिनाच्या निमित्ताने पर्यावरण जण जागृती.
वर्षाताई भंडारी यांच्या हस्ते उत्साहात धावजारोहन संपन्न..

कुकाणा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
कुकाण्यात किड्स किंग्डम विद्यालयात प्रजासात्तक दिनाच्या निमित्ताने पर्यावरण जण जागृती करण्यात आली, प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत धावजारोहन
वर्षाताई ललितसेठ भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले, प्रसंगी डॉ. रेशमा समीर बाफना, डॉ.श्रुती सरोदे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.उपस्थित पालकामधून प्रा. संतोष चोपडे सर यांनी मुलांना प्रजासत्ताक दिनानिमित्त माहिती दिली तसेच मेजर अनंत देशमुख सर यांनी मुलांना मोबाईल चे दुष्परिणाम समजून सांगितले डॉक्टर रेश्मा बाफणा यांनी मुलांना जंग फूडचे सेवन कमीत कमी करण्याचे आवाहन केले. वर्षाताई भंडारी यांनी मुलांचे मनोबल वाढविणारे मार्गदर्शन केले इयत्ता पहिलीतील आयुष नवले तसेच LKG मधील अथर्व राऊत या मुलांनी भाषणे केली.
त्यानंतर ग्रीन इंडिया क्लीन इंडिया हा संदेश विद्यार्थ्यांनी पर्यावरण वाचावा देश वाचावा, प्लास्टिक चा वापर टाळा, झाडें लावा अशा प्रकारचे फलक घेऊन कुकाणा बाजार पेठेत जनजागृती फेरी काढून चांगला संदेश ग्रामस्थांना दिला,
.मुलांनी न्युज पेपर चा ड्रेस घालून माझा वापर करा असा संदेश दिला, तसेच प्लास्टिकचा ड्रेस घालून याचा वापर टाळा असा संदेश दिला, तसेच झाडांचा पोशाख घालून घालून झाडे वाचवा असा संदेश दिला.
तसेच कचरा व्यवस्थापनासाठी व स्वछता ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना साठ हुन अधिक दुकानात डजबीन चे मोफत वाटप विद्यार्थ्यांच्या हस्ते केले. कुकाणा ग्रामस्थांनी केलेल्या उपक्रमाचे स्वागत या वेळी केले, ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच सोमनाथ कचरे यांनी विद्यालयाचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्राचार्या कीर्ती बंग यांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिक्षिका अनिता बडे, प्रसंगी प्रतिभा कदम,रोहिणी सरोदे , पूजा पवार,वैष्णवी कदम शिक्षक आदी शिक्षिका कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश वीर तर सूचना महादेव जाधव या शिक्षकांनी दिल्या.
.शिक्षक विशाल जैन यांनी आभार प्रदर्शन केले.




