Breaking
ई-पेपरकृषीवार्ता

विकसित कृषि संकल्प अभियान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर : -श्री. नारायण निबे

0 6 0 5 0 7

विकसित कृषि संकल्प अभियान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर : श्री. नारायण निबे

अहिल्यानगर – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

विकसित कृषि संकल्प अभियान हा केंद्र सरकारचा एक स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग, कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषि क्षेत्रात काम करणा-या यंत्रणा एकत्र येऊन शेतकऱ्यांना गावांमध्ये जाऊन मार्गदर्शन करत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत हे या उपक्रमातील अधिकारी जाणून घेतात. यामुळे विकसित कृषि संकल्प अभियान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्राचे कृषि विद्या विभागाचे विभाग प्रमुख श्री. नारायण निबे यांनी केले.

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने राष्ट्रीय अजैविक ताण नियंत्रण संस्था, बारामती, नगर तालुका कृषि विभाग व आत्मा अहिल्यानगर , यांच्या समन्वयाने विकसित कृषि संकल्प अभियानांतर्गत मौजे निंबळक ता. नगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी निंबळक गावचे सरपंच अक्षय लामखडे, दहिगाव ने येथील कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ सचिन बडधे , डॉ. गवळी, मंडळ कृषि अधिकारी श्रीमती घोरपडे, कृषि अधिकारी विजय सोमवंशी, चैतन्य बडवे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक उमेश डोईफोडे उपस्थित होते.

याप्रसंगी निंबळक या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. कोतकर यांनी यावेळी विकसित कृषि संकल्प अभियानाला शुभेच्छा दिल्या. यावेळी शेतक- याना खरीप हंगाम नियोजन बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये जनावरांचे आहार पोषण, सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान विषयी मका, मुग, तुर, पिकांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. यावेळी सोयाबीन उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या कार्यक्रमासाठी निंबळक गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे