Breaking
ई-पेपर

*मुळा कारखाना निवडणुकीत सहकार पॅनलला पाठिंबा देण्याचे यशवंतराव गडाख यांचे सभासदांना भावनिक आवाहन*

0 8 9 9 8 9

*मुळा कारखाना निवडणुकीत सहकार पॅनलला पाठिंबा देण्याचे यशवंतराव गडाख यांचे सभासदांना भावनिक आवाहन*

*नेवासा प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा*

मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे संस्थापक व माजी खासदार-माजी आमदार यशवंतराव गडाख यांनी सभासद शेतकरी, ऊस उत्पादक व कामगारांना उद्देशून एक भावनिक पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रातून त्यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेत सहकार पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
पत्रात गडाख यांनी नमूद केले आहे की, मुळा कारखान्याच्या उभारणीपासून सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच संस्था आज मजबूत झाली आहे. सहकार पॅनलच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे कारखान्याने यशस्वी वाटचाल करत आर्थिक स्थैर्य प्राप्त केले. कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत विविध विकासकामे आणि प्रकल्प राबविले असून सभासदांच्या पाठबळामुळेच ही यशस्वी घोडदौड शक्य झाली असल्याचे त्यांनी सांगितले.


कारखान्याने राज्यात ऊस दर, आर्थिक शिस्त आणि उत्पादनक्षमतेबाबत वेगळा ठसा उमटविला असल्याचा उल्लेख करत गडाख यांनी शेतकरी, कामगार आणि सभासदांचे विशेष आभार मानले आहेत. मुळा कारखाना हा केवळ उद्योग नसून हजारो शेतकरी कुटुंबांच्या विश्वासाचे केंद्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी निवडणुकीत बहुतांश जागा बिनविरोध झाल्याचा उल्लेख करत उर्वरित चार जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. सभासदांनी विकासाची परंपरा कायम ठेवत एकजुटीने मतदान करावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
मुळा कारखान्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत सभासदांनी दिलेले प्रेम, सहकार्य आणि विश्वास हीच संस्थेची खरी ताकद असल्याचे सांगत गडाख यांनी भविष्यातही कारखान्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र राहण्याचे आवाहन केले आहे.
“विश्वास, विकास आणि सहकाराची परंपरा कायम ठेवण्यासाठी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा,” असा संदेश यशवंतराव गडाख यांनी आपल्या पत्रातून सभासदांना दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे