Breaking
ई-पेपर

*तेलकुडगाव–निंबे नांदूर रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार; सुजय विखे पाटलांचे आश्वासन*

0 8 9 9 8 9

*तेलकुडगाव–निंबे नांदूर रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार; सुजय विखे पाटलांचे आश्वासन*

नेवासा प्रतिनिधी :

नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ते निंबे नांदूर या सुमारे ८ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, या मार्गाच्या डांबरीकरणासाठी माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजयदादा विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या भेटीदरम्यान सुजय विखे पाटील यांनी या रस्त्याच्या प्रश्नात स्वतः लक्ष घालून तो मुख्यमंत्री ग्रामसडक योजना किंवा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

तेलकुडगाव–निंबे नांदूर हा मार्ग स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा रस्ता दोन तालुक्यांना जोडणारा तसेच अहिल्यानगर जिल्ह्याकडे जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाळ्यात संपूर्ण रस्ता चिखलमय व धोकादायक होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. तसेच रुग्णांना वेळेत वैद्यकीय सुविधा मिळवून देताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात तेलकुडगाव ते निंबे नांदूर या रस्त्याचा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश करून कामास लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत सुजय विखे पाटील यांनी “मी स्वतः लक्ष घालून हा रस्ता लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतो,” असे आश्वासन दिल्याने परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे नेवासा तालुका सचिव अर्जुन कर्डिले, कमलेश काळे, दत्तू भैय्या काळे आणि किरण परभणे यांनी सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
रस्ता मंजुरीकडे आता नागरिकांचे लक्ष
तेलकुडगाव–निंबे नांदूर रस्त्याची दुरवस्था अनेक दिवसांपासून कायम असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. आता सुजय विखे पाटील यांनी स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने या रस्त्याला लवकरच निधी व प्रशासकीय मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार का, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

5/5 - (3 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे